You are currently viewing पक्षासाठी निधी दिला तर बिघडले कुठे?

पक्षासाठी निधी दिला तर बिघडले कुठे?

*पक्षासाठी निधी दिला तर बिघडले कुठे?*

*दीपक केसरकर यांनी गोव्यातील हॉटेल मधून घेतले पैसे..*

सावंतवाडी

राजकारणाची पातळी एवढी खाली घसरली आहे की कोण कोणाचे कपडे फाडतो..? कोण कोणाला उघडा करतो..? की दुसऱ्याला उघडा करताना स्वतः नागडा होतो..? हेच समजे गवनासे झालय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, उठसूठ प्रत्येक जण स्वतःचे चारित्र्य स्वच्छ असल्याचे जनतेला दाखवत आहे. जनता सुद्धा या पत्रकार परिषदांचे व्हिडिओ पाहून सोशल मीडिया, वर्तमानपत्रातील बातम्या वाचून मनसोक्त आनंद घेत आहेत. परंतु राजकारण्यांनी हे ध्यानात ठेवावे की, ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्यावेळी उरलेली चार बोटे स्वतःकडे वळलेली असतात. जनतेला त्या एका नव्हे तर वळलेल्या चार बोटांचा हिशोब द्यावा लागतो, अन्यथा जनता आपल्या एका बोटाने त्याच्या हिशोबाची परतफेड करते.. मतांच्या स्वरूपात..!
*केसरकारांनी पक्षासाठी निधी दिला तर बिघडले कुठे..?*
नामदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर आरोप करताना उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी केली होती, ती आपण पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या टर्ममध्ये आपल्याला मंत्रिपद दिले नाही.. असा गौफ्यस्फोट केला होता. यावर शिल्पग्राम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उत्तर देताना खा. विनायक राऊत यांनी “पक्षासाठी निधी दिला तर बिघडले कुठे..?” असा प्रतिप्रश्न करून “शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी केली जाते” हे अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. त्याचबरोबर केसरकर यांनी विकासकामे न केल्याने नव्हे तर मातोश्रीवर पैसे न पोचविल्याने त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले होते, हे देखील स्पष्ट होत आहे. परिणामी दुसऱ्याला उघडा करता करता स्वतःचे कपडे फाडून घेण्यासारखी परिस्थिती झाली आहे.
*परतफेडीच्या अटीवर केसरकरांनी गोव्याच्या हॉटेलमध्ये शिवसेनेकडून पैसे घेतले*
पक्ष कोणताही असो, निवडणुकीसाठी जे उमेदवार देतात त्यांना पक्ष निधी दिला जातो. खा.विनायक राऊत यांना देखील तो दिला जात असेलच, अन्यथा खासदारकी लढविणे एवढे सोपे काम नव्हे..! ना.दीपक केसरकर यांना देखील निवडणुकीसाठी गोव्यातील हॉटेलमध्ये पैसे दिले असतील. कारण काळा पैसा कधीही चोरीछुपेच दिला जातो. दिला जाणारा पैसा जर व्हाइट मनी असता तर केसरकर यांच्या घरी दिला गेला असता, जसा केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना चेकने पक्षनिधी दिला तसाच..! त्यामुळे दोन वेळा दिलेली आर्थिक मदत म्हणजे दोन निवडणुकांसाठी दिलेला निवडणूक निधी, जो प्रत्येक उमेदवाराला मिळतोच.
*केसरकरांना काहीही नसताना पक्षात घेतले, आमदार, मंत्री केले*
ना.दीपक केसरकर हे राष्ट्रवादीचे एक टर्म पूर्ण होत आलेले सावंतवाडीचे तत्कालीन आमदार होते, आमदारकीचा व राष्ट्रवादी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते शिवसेनेत आले होते. त्यांना पहिल्यांदा शिवसेनेने आमदार केले नव्हते. कदाचित खा. विनायक राऊत हे पैशांचा हिशोब घालता घालता हे मात्र विसरले, असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत आवाज उठविला आणि राणेंना पराभवाला सामोरे जावे लागले होते. ना.दीपक केसरकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात, राज्यात नारायण राणेंच्या विरोधात राळ उठविली आणि दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत लोकांना राणेंच्या विरोधात उभे राहण्यास प्रवृत्त केल्याने खासदारकीच्या निवडणुकीत निलेश राणे पडले. आणि मुंबईतून थेट जिल्ह्यात आलेले विनायक राऊत लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले. एवढेच नव्हे तर कुडाळ मालवण मतदारसंघात १० हजारांच्या फरकाने वैभव नाईक यांनी राणेंना धूळ चारली होती. या निवडणुकांमध्ये दीपक केसरकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे खा.विनायक राऊत यांनी कबूलही केले होते. दुसऱ्या खासदारकीच्या निवडणुकीत निलेश राणे पराभूत झाले, तेव्हाही केसरकरांची जादू ओसरली नव्हती. परंतु विनायक राऊत जर आता हे अमान्य करत असतील तर येत्या निवडणुकीत जनता मात्र ते विसरणार नाही..आणि पूर्वीचेच लीड त्यांना टिकवावे लागेल..
कारण, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कणकवली मतदारसंघात फेर निवडणूक होऊन नारायण राणे यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक परशुराम उपरकर यांना स्वतःचे डिपॉझिट देखील वाचवता आले नव्हते.. आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे “परशुराम उपरकर यांच्या प्रचारासाठी खुद्द हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कणकवली येथे सभा घेतली होती. तरीसुद्धा शिवसेनेला आपले डिपॉझिट वाचवता आले नव्हते. अशी दयनीय अवस्था शिवसेनेची असताना मुंबईतून आलेले विनायक राऊत लाखांच्या मतांनी निवडून आले हे फक्त शिवसेनेचे यश होते का..? जिथे सुरेश प्रभुंसारखे निष्कलंक लोकप्रतिनिधी शिवसेनेत असताना पराभूत झाले तिथे विनायक राऊत शिवसेनेच्या जीवावर निवडून येणे शक्य होतं का..? याचा विचार करणे अत्यावश्यक आहे.
*तशी परिस्थिती आल्यास गांधी चौकात सभा घेऊन पंचनामा करू..*
अलीकडेच (शिवसेना ऊबाठा) उद्धव ठाकरे यांची सभा सावंतवाडीच्या गांधी चौकात झाली होती. यावेळी व्यासपीठावर जोपर्यंत उद्धव ठाकरे यांची एन्ट्री झाली नव्हती तोपर्यंत विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात एकही शब्द ना.दीपक केसरकर यांच्या विरोधात उच्चारला नव्हता. जेव्हा उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित झाले, तेव्हाच राऊतांनी केसरकरांवर तोंडसुख घेतले होते. यापूर्वीचा गांधी चौकातील सभेचा इतिहास पाहिला असता ज्या ज्या नेत्यांनी सावंतवाडी शहरात येऊन दीपक केसरकर यांच्यावर टीका केली, त्या सर्व पक्षांचं निवडणुकीत पानिपत झालं आहे. काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या सावंतवाडी व वेंगुर्ला येथे नगरपालिका निवडणुकी करिता सभा झाल्या होत्या. त्यावेळी सावंतवाडीत नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जहाल टीका केली होती.त्यावेळी सावंतवाडीच्या जनतेने १७/० असा विजय केसरकर यांच्या पदरी देऊन काँग्रेसचे पानिपत केले होते. अशी बरीच उदाहरणे आहेत की, सावंतवाडीच्या सुपुत्रावर सावंतवाडीत केलेली टीका सावंतवाडीकर जनता सहन करत नसल्याने खा.विनायक राऊत यांनी घोषणा वजा धमकी देताना आपण जे करणार तेच बोलणे योग्य वाटतं.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा