You are currently viewing कासारवर्णेत दोन दुचाकीमधील अपघातात कळणेतील युवतीचा मृत्यू

कासारवर्णेत दोन दुचाकीमधील अपघातात कळणेतील युवतीचा मृत्यू

कासारवर्णेत दोन दुचाकीमधील अपघातात कळणेतील युवतीचा मृत्यू

दोडामार्ग

कासारवर्णे येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात कळणे – करमळीवाडी येथील युवती जागीच ठार झाली. सुजाता सुरेश सातार्डेकर (२५) असे तीचे नाव आहे. मोपा विमानतळावरून नाईट शिफ्ट करून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. सुजाताच्या अपघाती निधनाने कळणे गावात शोककळा पसरली आहे.

सुजाता सातार्डेकर ही मोपा विमानतळावर कामाला होती. काही महिन्यांपूर्वीच तीने कामावर जाण्यासाठी दुचाकी घेतली होती. रात्री नाईट शिफ्ट करून सकाळी आपल्या दुचाकीने (एमएच ०७ एटी ११५०) घरी येण्यासाठी निघाली होती. कासारवर्णे येथे तीची आणि (जीए ११ जे २१२८) या दोन दुचाकिंमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यात सुजाता दुचाकीवरून रस्त्यावर कोसळली. तीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. अपघातात फैजर फ्रान्सिस मास्कारेन्हस (२२, रा. हंसापुर, पेडणे) हा युवक गंभीररित्या जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. अपघाताचा पंचनामा मोपा पोलीसानी केला.

सुजाताच्या अपघाती जाण्याने सातार्डेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ती आईवडील, बहीण व लहान भावासमवेत राहत होती. घरात ती एकटी कमावती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + twenty =