You are currently viewing १७ मते मिळवणाऱ्या मनसे कडून डीपी प्लान बाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न – भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे 

१७ मते मिळवणाऱ्या मनसे कडून डीपी प्लान बाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न – भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे 

कणकवली

कणकवली नगरपंचायतच्या डीपी प्लान संदर्भात शहरात अवघी १७ मते मिळवणाऱ्या मनसे कडून शहरवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यावर टीका करण्यासाठी उपरकर यांना कणकवली शहरात एकही कार्यकर्ता मिळू नये हे एका माजी आमदार असलेल्या उपरकर यांचे दुर्दैव आहे. कणकवली शहरातील डीपी प्लान संदर्भात अद्याप सर्व प्रक्रिया व्हायच्या बाकी आहेत. शहरवासीयांना, विश्वासात घेऊन नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्ताधारी नगरसेवक हा सुधारित विकास आराखडा जनतेवर अन्याय न होता करण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडणार आहेत. कालच्या बैठकीत जाहीररीत्या नगराध्यक्ष यांनी ते सांगितले देखील आहे. उपरकर यांनी ज्या पद्धतीने १९९९ मध्ये केबिनमध्ये बसून आपल्या कणकवलीतील जमिनी वाचवून आराखडा केला तसा कुणाच्या फायद्यासाठी किंवा कुणावर अन्याय करण्यासाठी हा आराखडा केला जाणार नाही. हे देखील कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काल झालेल्या बैठकीबद्दल कणकवली वासियांमध्ये नेहमीप्रमाणे संभ्रम पसरवण्याचे काम उपरकर यांनी सुरू केले. उपरकर यांच्या मनसे पक्षाला कणकवली शहरात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये अवघी १७ मते मिळाली आहेत. अठरावे मत मिळवणे उपरकर यांना शक्य झाले नाही. त्यामुळे उपरकर यांचे कणकवलीकर किती ऐकतील ते सुद्धा विचार करण्यासारखे आहे. त्यात करून कणकवली शहरातील एकही कार्यकर्ता उपरकर यांच्यासोबत राहिला नसल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व खंडणी सारखे गुन्हे दाखल असलेल्या एकमेव पदाधिकाऱ्याला उपरकर यांच्या बाजूने तळी उचलावी लागत आहे. माजी आमदार असलेल्या उपरकर यांच्यावर अशी वेळ येणे हेच खरे दुर्दैव आहे. उपरकर यांच्यासोबत चे कार्यकर्ते त्यांना सोडून का गेले ? ते आधी त्यांनी अभ्यास करावे. माहितीच्या अधिकाराचा वापर करून जनतेला त्रास देण्याचे काम करत असल्यानेच उपरकर यांना १७ मतांवर कणकवली शहरात थांबावे लागते ही वस्तुस्थिती आहे. ज्या दया मेस्त्री यांनी उपरकर यांच्या बाजूने बोलत असताना बंडू हर्णे यांच्यावर टीका केली त्या दया मेस्त्री यांचा पूर्व इतिहास सर्वांनाच माहिती आहे. जे दया मेस्त्री कणकवली उपनगराध्यक्ष हर्णे यांच्या वर टीका करतात त्यांनी आपला कणकवली तालुक्यातील गाव अगोदर जाहीर करावा. दया मेस्त्री किंवा उपरकर यांना माहिती पुरवणाऱ्यांची नावे आमच्या जवळ असून वेळ आल्यास त्यांचा देखील योग्य समाचार घेऊ. जी व्यक्ती कणकवली शहराची मतदार नाही, नागरिक नाही अशा व्यक्तीने कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांना आरक्षण कसे असावे याची शिकवण देण्याची गरज नाही. उपरकर यांच्या शिकवणी खाली त्यांचे सुरू असलेले काम त्यांनी सुरू ठेवावे. तसेच आर्थिक तडजोड करण्यात कोण मास्टरमाइंड आहे ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा जाणतो. हायवे च्या प्रश्नाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याने हे अनुभवले आहे. त्यामुळे सुरुवातीपासून कणकवली शहर विकास आराखड्याच्या विषयात तक्रारी करून काही जमीन मालकांना आपल्यापर्यंत येण्यासाठी उपरकर यांचा हा प्रयत्न तर सुरू नाही ना ? असा प्रश्न आता कणकवली शहरात जनतेला पडला आहे. नगरपंचायतच्या डीपी प्लान संदर्भात सत्ताधारी म्हणून नगरपंचायत ने केलेले काम व प्रत्येक सर्वे वेळी त्याची घेतलेली माहिती ही जनतेसमोर वारंवार आलेली आहे. नगरपंचायत कार्यालयात देखील याबाबतची माहिती सर्वांसाठी उपलब्ध आहे. मात्र सर्व माहिती असून देखील केवळ आरक्षण असलेल्या जमीन मालकांना घाबरवून घालण्यासाठी व या जमीन मालकांनी आपल्याकडे येण्याकरिता उपरकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी दया मेस्त्री यांचे सुरू असलेले प्रयत्न भाजपा कदापि साध्य होऊ देणार नाही. कणकवली शहरातील कुणाही आरक्षण जमीन मालकावर अन्याय होऊ न देता आरक्षणे कमी करण्यावर व सुधारित विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी तो नगरपंचायतच्या सभागृहात ठेवून जनतेला अपेक्षित असलेला ठराव केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे उपरकर यांच्या काळात जसा गोपनीय रित्या आराखडा मंजूर झाला तसा होणार नाही हे देखील नगराध्यक्ष नलावडे यांनी जाहीर केले आहे. हे सुद्धा उपरकर यांनी विसरू नये असा टोला कोदे यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + eleven =