माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी डी .स. डब्ल्यू पोर्टल किंवा www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
सैनिक कल्याण विभागाचे संचालक यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक मदती दिनांक ०१ जुलै २०२५ पासून MAHADBT प्रणालीव्दारे अदा करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात एकूण ५ हजार ५६३ सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, अवलंबित यांची नोंद आहे. त्यापैकी २ हजार ८५ सेवानिवृत्त अधिकारी,माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी,वीरनारी,अवलंबित यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik. maharashtra.gov.in या संकेस्थळावर On Line Registration केले आहे. उर्वरीत सुमारे ३ हजार ४७८ अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी वीरनारी यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या संकेस्थळावर जाऊन तात्काळ On Line Registration करावयाचे आहे.
तसेच यापुढे या कार्यालयाकडुन कल्याणकारी निधी व KSB च्या आर्थिक मदती तसेच इतर विविध योजनांच्या आर्थिक मदतीचे अर्ज संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या संकेस्थळावर On Line Registration केली असल्याची खात्री करुनच स्विकारले जातील व त्यांनाच आर्थिक मदती दिल्या जातील याची नोंद घ्यावी.
नोंदणी केल्यानंतर भरलेला फॉर्म जिल्हा सैनिक कायार्लय, सिधुदुर्ग येथे जमा करुन खात्री करावी. ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांचे ओळखपत्र खूपच खराब अथवा वापरण्यास योग्य नाही त्यांना नवीन ओळखपत्र त्वरीत दिले जाईल व उर्वरीत नोंदणी केलेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना नवीन ओळखपत्र केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाल्यावर दिले जाईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कायार्लयाचा दुरध्वनी क्र-०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.