You are currently viewing श्री छत्रपती शिवाजी महाराज

श्री छत्रपती शिवाजी महाराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्री छत्रपती शिवाजी महाराज*

(*पंचाक्षरी*)

 

 

शिवाजी राजे

योध्दा झुंझार

मोगलांना हा

वाटे अंगार…..१

 

जिजा देतसे

उच्च संस्कार

ध्येय होतसे

मग साकार…..२

 

राजे शिवाजी

आदर्श राजा

सुस्वराज्याने

आनंदी प्रजा…..३

 

मोगलांचा हा

कर्दनकाळ

शत्रुची चाले

ही पळापळ……४

 

स्त्रिचा करावा

सदा आदर

अमुल्य असे

केले संस्कार…….५

 

हिंदवी राज्य

स्वप्न मनात

शक्ती युक्तीने

आले सत्यात….६

 

आहे दैवत

छबी मनात

अटकेपार

किर्ती विश्वात……७

 

स्वराज्यासाठी

दिली दस्तक

आम्ही त्यापुढे

नतमस्तक…..८

 

 

डॉ दक्षा पंडित

दादर,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 14 =