You are currently viewing स्मार्टफोनमुळे 36% मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम

स्मार्टफोनमुळे 36% मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम

राष्ट्रीय बालहक्क आयोगाचा अभ्यासानंतर अहवाल

मुंबई 

स्मार्टफोन्सच्या अतीवापरामुळे लहान मुलांच्या एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत असल्याचं राष्ट्रीय बालहक्क आयोगानं केलेल्या एका अभ्यासातून समोर आलंय. देशातील जवळपास 24 टक्के मुलं झोपण्यापूर्वी स्मार्टफोन्स वापरतात, वयानुसार हे प्रमाण वाढत जातं आणि याचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचं आयोगाच्या अभ्यासात नोंदवण्यात आलंय.

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञ आधीच सांगत आहेत. मात्र आता या नव्या अभ्यासातून यावर शिक्कामोर्तब झालंय. देशातील 37.15 टक्के मुलांमध्ये स्मार्टफोन्सच्या अतीवापरानं एकाग्रता कमी झाल्याचं या अभ्यासातून समोर आलंय.

लॉकडाऊन त्यात सुरू झालेला ऑनलाइन शिक्षण व मुलांचा स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वाढता वापर यावर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (NCPCR) ने अभ्यास केला आहे. या अभ्यासातून देशातील मुलं इंटरनेट स्मार्टफोनचा वापर कशा पद्धतीने करतात? कितपत आहारी गेली आहेत ? यांच्या अतिवापरामुळे नेमके काय परिणाम होतात हे या अहवालामध्ये मांडले गेले आहे. यामध्ये देशातील शहरी तसेच ग्रामीण भागातील पाच हजार मुलांना या सर्व्हेमध्ये सहभागी करून यावर अभ्यास केला आहे.

 

    • 23.80 टक्के मुले हे झोपताना किंवा झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.

 

    • अभ्यासात असताना 13.90 टक्के विद्यार्थी नेहमी तर 23.30 टक्के विद्यार्थी अधून मधून स्मार्टफोनचा वापर करतात.

 

    • देशातील 37.15% मुलांना नेहमी किंवा वारंवार, स्मार्ट फोनच्या वापरामुळे एकाग्रता कमी झाल्याचा अनुभव येत आहे.

 

    • 13.85 टक्के मुलांना नेहमी तर 23.30 टक्के मुलांना अधूनमधून आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत स्मार्टफोनवर संवाद साधायला आवडतो.

 

    • इंटरनेट वापरामुळे खूप जास्त क्रिएटिव्हिटी वाढते असे 31.50 टक्के मुलांना वाटते.

 

    • स्मार्टफोन हे मनोरंजनाचे चांगलं साधन असल्याचं 76.20टक्के मुलांना वाटतं.

 

    • 48.20 टक्के मुलांनी जग हे स्मार्ट फोनच्या आहारी गेल्याच मान्य केले आहे.

 

    • तर 76.20 पालकांनी आपल्या मुलांनी मोबाईल किती वेळ वापरावा या चा वेळ सुद्धा निश्चित केला आहे.

 

त्यामुळे जर आपली मुलं इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरामुळे त्याच्या आहारी जाऊ नये असा तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांच्याशी खुलेपणाने संवाद करणे गरजेचे आहे. त्यांना खऱ्या अर्थाने मोबाईल आणि इंटरनेट चा वापर कशा पद्धतीने करायचा याची शिकवण देणे सुद्धा गरजेचे आहे. सोबतच मैदानी खेळ किती महत्त्वाचे आहेत? हे सुद्धा समजून सांगून त्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या लहान मुलांच्या वापराबाबत जो अभ्यास समोर आणला आहे. त्यात आता प्रत्येक पालकाने सतर्क होऊन आपली मुले मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या आहारी तर गेली नाही ना याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होणार नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − two =