You are currently viewing डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस प्रकल्पाचे कार्यशाळेच्या माध्यमातून केले आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस प्रकल्पाचे कार्यशाळेच्या माध्यमातून केले आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

अमरावती – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते. हे जयंती सप्ताहाचे निमित्त साधून डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस प्रकल्पाने अमरावती शहरातील आदिवासी विभागात येणाऱ्या संपूर्ण अमरावती शहरातील विविध वस्तीगृहांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. आदिवासी विभागाच्या आयुक्त श्रीमती नयना गुंडे अपर आयुक्त श्री सुरेश वानखडे उपायुक्त श्रीमती जागृती कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन आयोगाचे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी अमरावती शहरात नवसारी राठीनगर सोनल कॉलनी समता कॉलनी गोपाल नगर गडगडेश्वर मंदिर अकोली रोड रुक्मिणी नगर कवर नगर अशा विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे वस्तीगृह आदिवासी विभागातर्फे चालवण्यात येतात. या सर्व वसतीगृहात शिवजयंती सप्ताहानिमित्त दररोज स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी आदिवासी विभागाच्या उपायुक्त श्रीमती जागृती कुमरे यांनी पुढाकार घेतला .त्यांनी अपर आयुक्त आदिवासी विभाग या ठिकाणी अमरावती शहरातील सर्व वार्डन अधीक्षकांची एक सभा घेतली .या सभेला त्यांनी व प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी मार्गदर्शन केले. या सभेमध्ये संपूर्ण 17 वस्तीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक जनजागृती करण्याचे ठरले त्याप्रमाणे संपूर्ण दहा दिवस हा उपक्रम अमरावती शहरातील सतरा वस्तीगृह व परतवाडा येथील चार वस्तीगृह अशा संपूर्ण आदिवासी वस्तीगृहांमध्ये राबविण्यात आला .त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे या 17 आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहातील मधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जागृत झाले असून छत्रपती शिवराय यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम सध्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये चर्चेत आहे गत वर्षी देखील डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या प्रकल्पांतर्गत प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी शिवजयंती सप्ताह निमित्त गडचिरोली जिल्ह्यात 14 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केल्या होत्या .असेच कार्यक्रम नियोजित आयोजित केले तर आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत यशस्वी होऊ शकतात असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकाशनार्थ .प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा