You are currently viewing दोडामार्गातील सैनिक संघटनेतर्फे जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली

दोडामार्गातील सैनिक संघटनेतर्फे जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली

दोडामार्ग

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व अन्य सेनेतील उच्चपदस्थ अधिकारी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर दोडामार्गातील आजी-माजी सैनिक संघटनेने शोकसभा आयोजित करत जनरल रावत व अन्य अधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सदर शोकसभा दोडामार्ग शहरातील पिंपलेश्वर सभागृहात आयोजित केली होती.

तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका आणि सेनेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे आजी-माजी सैनिक संघटनेने रावत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना व त्यांच्या पत्नी मधूलिका व अन्य अधिकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थित सैनिकांनी बिपिन रावत अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन दोडामार्ग शहर परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे अनेक उपस्थित आजी-माजी सैनिकांना या घटनेमुळे अश्रू देखील अनावर झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा