You are currently viewing समोर माझ्या

समोर माझ्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

@# *समोर माझ्या* #@

 

समोर माझ्या पिऊन चहा

टुक टुक मजला कां करते

नजर रोखून माझ्यावरती

कोणते आव्हान मज देते

 

पुढचे जन्मी होईन मी कप

आवडेल शिक्षा ती मजला

“ओठी राहीन” तुझ्या सदैव

चहा प्यायला आवडेल तुला

 

बघत रहा तू अशीच रोखून

अंगावरती नजर *मधाळ*

“हृदय” होतसे कंपित माझे

कपही हसतो कसा खट्याळ

 

शोधीत होतो कुठे हरवली

स्वप्नातील माझी मधुबाला

निराश नाही झालो कधीही

नाही पकडली *मधुशाला*

 

भिंतीवरचे *चित्र* देखणे

छळत असेते स्वप्ना मधून

कधीही येऊन भेट देत जा

सखये मजला अधुनमधून

 

विनायक जोशी 🥳ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

५४/बुधवार/१ फेब्रुवारी २०२३

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =