You are currently viewing दर्जेदार औषधे व कीटकनाशके द्या, अन्यथा गय करणार नाही – नितेश राणे

दर्जेदार औषधे व कीटकनाशके द्या, अन्यथा गय करणार नाही – नितेश राणे

दर्जेदार औषधे व कीटकनाशके द्या, अन्यथा गय करणार नाही – नितेश राणे

देवगड येथे आंबा बागायतदार व शेतकऱ्यांची बैठक

देवगड

आंबा बागायतदार, शेतकऱ्यांची किटकनाशक औषधांमधून फसवणूक होता नये याची खबरदारी कृषी विभाग व विक्रेत्याने घ्यायची आहे. गुणवत्ता धारकच औषधे विक्री करा, परिणामकारक नसलेली किटकनाशक औषधांची विक्री केली तर त्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जन इशारा जामसंडे येथील किटकनाशक कंपनी, किटकनाशक विक्रेते व आंबा बागायतदार यांच्या संयुक्त बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांनी दिला.

जामसंडे येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहामध्ये आंबा पिकावरील फुलकिडींच्या नियंत्रणासाठी करावयाची उपाययोजना अंतर्गत विशेषता करुन थ्रीप्स नियंत्रणामध्ये आणण्यासाठी किटकनाशक विक्रेते आणि आंबा बागायतदार यांची संयुक्त सभा आमदार नितेश राणे यांनी घेतली. यावेळी तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, माजी आमदार अजित गोगटे, शेतकरी बागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास रुमडे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आरिफ बगदादी, आंबा बागायतदार जनार्दनशेठ तेली व तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकरी, कृषी औषध विक्रेते, कृषी औषध कंपनीचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी, कृषी गुणवत्ता विभागाचे अधिकारी, संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

देवगड तालुक्यामध्ये आंबा कलमांच्या मोहोरावरती थ्रीप्स या रोगाने थैमान घातले आहे. अनेक महागडी किटकनाशक औषधे वापरुनही हा थ्रीप्स नियंत्रणामध्ये येत नसल्यामुळे आंबा बागायतदारांनी आमदार नितेश राणे यांची काहि दिवसांपुर्वी भेट घेवून सदर किटकनाशक कंपनीच्या प्रतिनिधींची, कृषी अधिकारी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांची बागायतदारांसमोर बैठक घेण्यात यावी असा आग्रह केला होता. यावरती आंबा बागायतदारांची तात्काळ मागणी मान्य करुन ही बैठक आज घेण्यात आली. या बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांनी किटकनाशक कंपनीच्या प्रतिनिधींना, कृषी अधिकारी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांना व विक्रेत्यांना इशारा दिला कि, आंबा बागायतदारांचे नुकसान होता नये, गुणवत्ता असलेलीच औषधे विक्री केली पाहिजेत, शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर आपण गप्प् बसणार नाही. शेतकऱ्यांची काळजी घ्या अन्यथा तुम्हाला काळजी करावी लागेल. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असा सज्जन इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा