You are currently viewing शिवजयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेची एबीसीडी या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

शिवजयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेची एबीसीडी या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

अमरावती :

येत्या शिवजयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारीला अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकॅडमीच्या मिशन आयएएस या उपक्रमा अंतर्गत स्पर्धा परीक्षेची एबीसीडी (ए बी सी डी ऑफ आयएएस) या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आवश्यक असून दिनांक 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त या पुस्तकाचे विनामूल्य वितरण होणार आहे. हे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी सहाय्यक आयुक्त श्री संजय कुमार राव राची झारखंड तसेच ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल रांची आणि सेंट झेवियर स्कूल देवघर रांची झारखंड यांनी पुढाकार घेतलेला आहे. श्री संजय कुमार राव हे सहाय्यक आयुक्त म्हणून झारखंड राज्यातील रांची येथे कार्यरत असून त्यांनी पुढाकार घेऊन या पुस्तकाचे इंग्रजी प्रकाशन घडवून आणले आहे. मराठीमध्ये प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी लिहिलेले हे पुस्तक असून हे इंग्रजी भाषांतर धामणगाव रेल्वे येथील आदर्श कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक मेजर प्रा शरद पुसदकर यांनी केले आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्ये देखील या पुस्तकाचे विनामूल्य वितरण होणार आहे. या पुस्तकाची प्रत विनामूल्य प्राप्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्याशी 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.

प्रकाशनार्थ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा