You are currently viewing माझी माय मराठी

माझी माय मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझी माय मराठी*

 

मराठी भाषा आहे

महाराष्ट्राची शान,

मराठी मायबोलीचा

आम्हाला अभिमान..।१।

 

आम्ही मराठे सगळे

मराठीच बोलणार,

मराठीतूनच मनाची

बंद दार खोलणार..।२।

 

मराठी आमची शान

तिचा वारसा चालवू,

सर्व भाषांचा तरीही

आदर करु मान ठेवू..।३।

 

आम्ही महाराष्ट्रात

मराठीला मान देतो,

मराठीच्या तालावर

हर्षाने डोलत असतो..।४।

 

शिवरायांची मराठी

ज्ञानेश्वरीची भाषा,

पोवाड्याचे शौर्य

अन् लावणीची आशा..।५।

 

जगात लाखमोलाचा

आहे मराठी बाणा,

अभिमान बाळगावा

असावा ताठरकणा..।६।

 

माझी माय मराठी

आहे फारच देखणी,

यामुळेच समृद्धशाली

झाली माझी लेखणी..।७।

 

 

✍🏻 *अख़्तर पठाण.*

*(नासिक रोड)*

*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 8 =