You are currently viewing माजी आमदार परशुराम उपरकार यांच्या नेतृत्वाखालील सा.बा. कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवली येथे 15 फेब्रुवारीला आंदोलन

माजी आमदार परशुराम उपरकार यांच्या नेतृत्वाखालील सा.बा. कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवली येथे 15 फेब्रुवारीला आंदोलन

माजी आमदार परशुराम उपरकार यांच्या नेतृत्वाखालील सा.बा. कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवली येथे 15 फेब्रुवारीला आंदोलन

मा आमदार उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन….. सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी केले

सावंतवाडी :

नौसेना दिन मालवणात 4 डिसेंबरला साजरा झाला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या हॅलीपॅड तसेच रस्ते, किल्ला उभारणी व अन्य कामात मध्ये घोटाळा झाला आहे. कामे योग्य पद्धतीने झालेली नाहीत असे चित्र दिसून येत आहे. या कामाची माहितीही कार्यकारी अभियंता देत नाहीत. त्यामुळे या बाबत जनतेचा आवाज बनून माजी आमदार परशुराम उपरकर 15 फेब्रुवारी रोजी सा.बा. कार्यकारी अभियंता कार्यालय कणकवली येथे आंदोलन छेडणार आहे.

या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याच्या भावना जनतेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणवार प्राप्त होत आहेत. कार्यकर्तेही उत्स्फूर्त पणे पाठिंबा देत आहेत. मात्र आंदोलन लोकशाही व शांततेच्या मार्गाने करून जो पर्यत अधीक्षक अभियंता उपस्थित राहून सर्व मागण्या ऐकून घेत चर्चा करणार नाहीत तोपर्यंत, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कामात पारदर्शकपणा असला पाहिजे. जनतेच्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. काम नियमानुसार योग्य पद्धतीने असले पाहिजे. हीच आमची भूमिका राहणार आहे. असेही सांगण्यात आले आहे.

झालेल्या कामांची उच्च यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशीही भूमिका राहणार आहे. असेही स्पष्ट करण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा