You are currently viewing डेगवे येथील बीएसएनएलचा टाँवरची रेंज त्वरीत सुरु करा….!

डेगवे येथील बीएसएनएलचा टाँवरची रेंज त्वरीत सुरु करा….!

डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाची मागणी.

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात कार्यान्वित असलेल्या बीएसएनएलची रेंज वारंवार खंडित होते.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ अतिशय कंटाळले आहेत. तरी संबंधित अधिकारी यांनी याबाबत त्वरीत लक्ष देऊन सदर रेंज त्वरीत दुरुस्ती करावी. अशी मागणी डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
या गावात गावातील भौगोलिक परिस्थिती पहाता आंबेखणवाडी, जांभळवाडी, फणसवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी, वराडकरवाडी, मिरेखणवाडी या वाड्या उंच, सखल भागात वसलेल्या आहेत. त्यामुळे मोबाईलला रेंज मिळत नव्हती.हि व्यथा रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार मा.विनायक जी राऊत यांच्याकडे संस्था पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मांडली.त्यामुळे सदर बाबतीत त्यांनी विशेष लक्ष देऊन २ वर्षापूर्वी नवीन मोबाईल टाँवरची उभारणी केली आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून समाधान व्यक्त केले होते.परंतु अधुनमधून रेंज नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत. या गावात जि.प.प्राथमिक शाळा, महाविद्यालय, तलाठी कार्यालय, विविध सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, वनविभागाचे कर्मचारी शिवाय इतर ग्रामस्थ त्रस्त आहेत. तरी संबंधीत अधिकारी यांनी या बाबतीत त्वरीत लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.

उल्हास देसाई
,सरचिटणीस,
डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =