You are currently viewing कवी राहुल भोसलेंसह अन्य मान्यवरांचा सत्कार

कवी राहुल भोसलेंसह अन्य मान्यवरांचा सत्कार

कवी राहुल भोसलेंसह अन्य मान्यवरांचा सत्कार

पुणे (प्रतिनिधी)

पुणे कॅम्पातील समता सामाजिक संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुणे स्टेशन येथील (मालधक्का) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आणि प्रसिद्ध साहित्यिक, कवी, राहुल भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील ४०, मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन “ओ शेठ ” फेम गायक उमेश गवळी यांच्या हस्ते उचित गौरव करण्यात आला.फेटा,ट्राॅफी,शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सदरहू सोहळ्यास कॅम्प परिसरातील जेष्ठ नागरिक, माता-भगिनी,प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते.जुन्या काळातील गीतांनीं सर्वांना मंत्रमुग्ध केले.समता प्रतिष्ठान चे संस्थापक मा.विजय भोसले यांनी प्रस्तुत सोहळ्याचे आयोजन केले.कर्तव्य फौंडेशनचे अध्यक्ष मा.विकास भांबुरे यांच्या सुत्रसंचलनाने सोहळ्याला रंगत आली.पुणे कॅम्पातील प्रसिद्ध “दालच्या” या सुग्रास भोजनाची मेजवानी उपस्थितांना देण्यात आली.कार्यक्रमाचा समारोप विकास भांबुरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =