You are currently viewing कारिवडे येथे उद्या निमंत्रितांची भजन स्पर्धा

कारिवडे येथे उद्या निमंत्रितांची भजन स्पर्धा

कारिवडे येथे उद्या निमंत्रितांची भजन स्पर्धा

सावंतवाडी

कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थांच्यावतीने गणेश जयंतीनिमित्त पेडवेवाडी शाळा नं २ येथे मंगळवारी १३ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सातेरी प्रासादिक भजन मंडळ (सातुळी) बुवा अमित परब, रात्री ७.४० वाजता श्री देवी माऊली भजन मंडळ (साटेली) बुवा सत्यनारायण कळंगुटकर, रात्री ८.२० वाजता श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ (वेंगुर्ले) बुवा हर्षल मेस्त्री, रात्री ९.३० वाजता दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ (वैभववाडी) बुवा विराज तांबे, रात्री १०.१० वाजता श्री पावणाई भजन मंडळ (जानवली) बुवा गोगेश मेस्त्री या भजन मंडळांचे सादरीकरण होणार आहे.स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१ रुपये, द्वितीय ३००१ रुपये, तृतीय २००१ रुपये, उत्तेजनार्थ १००१ रुपये आणि आकर्षक सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियम वादक, पखवाज वादक, तबला वादक, झांजवादक, कोरस यांना प्रत्येकी ५०० रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण व तज्ज्ञ परीक्षकांचे सादरीकरण रात्री ११ वाजता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =