You are currently viewing विद्युत स्पार्किंगमुळे चिंदर सडेवाडीत कलम बागेला आग लागून नुकसान…

विद्युत स्पार्किंगमुळे चिंदर सडेवाडीत कलम बागेला आग लागून नुकसान…

मालवण
वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या विद्युत स्पर्किंगमुळे चिंदर सडेवाडी येथील जत्रेच्या वडा नजीक असलेल्या सागर उत्तम गोलतकर यांच्या आंबा कलम बागेस आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत सुमारे शंभर हापुस आंबा कलमे आणि पन्नासहून अधिक काजू कलमे जळून सुमारे दिड लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याने लगतच्या कलम बागांवरील धोका टळला. चिंदर सडेवाडी येथे जत्रेच्या वडा नजीक सागर गोलतकर यांच्या बागेत तीस वर्षांची शंभर हापूस कलमे तसेच पन्नास काजू कलमे आहेत. याच बागेतून ११ केव्ही व्होल्टेजची विद्युत वाहिनी गेली आहे. येथील ग्रामस्थांच्या मते विद्युत स्पार्किंगमुळे दरवर्षी या भागात आग लागून नुकसान होत आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर गोलतकर यांच्या बागेला विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. या बाबतची खबर माउली रिसॉर्टचे मालक विशाल गोलतकर यांनी ग्रामस्थांना सांगताच बाबू हडकर, देवू हडकर, सतिश गोलतकर, सिद्धेश गोलतकर, भालचंद्र गोलतकर, खोत यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेत सागर गोलतकर यांना बागेतील आग विझविण्यासाठी मदत केली. यात गोलतकर यांच्या बागेतील हापूस आंबा व काजू कलमांसहीत झाडांना पाणी देण्याची पाईप लाईनही जळून नुकसान झाले. या भागात दर वर्षी शाॅर्ट सर्किट मुळे आग लागत असून या बाबत विद्युत मंडळाला वारंवार कल्पना देऊनही कोणती कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या बाबत तातडीने बागांमधील विद्युत पोल हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + fourteen =