You are currently viewing १५ फेब्रुवारी रोजी काजू बियाचा दर निश्चित साठी जिल्हा बँक सभागृहात सभेचे आयोजन

१५ फेब्रुवारी रोजी काजू बियाचा दर निश्चित साठी जिल्हा बँक सभागृहात सभेचे आयोजन

काजुमुळे आर्थिक क्रांती घडविली जाऊ शकते – आम नितेश राणे

 

ओरोस :

 

काजूला चांगला भाव मिळावा व काजू बागायतदारांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने भविष्यातील नियोजन संदर्भात जिल्हा बँकेच्या सभागृहात आम नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली. काजू इंड्रस्ट्ट्री, काजू प्रक्रिया, काजू बी उत्पादक व त्यामागील अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ व जिल्हा बँकेच्या संयुक्त विद्यमाने ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे, पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, काजू असोशियशन अध्यक्ष सूरज बोवलेकर, पणन मंडळाचे माजी अपर सचिव प्रमोद वळंज, सदस्य आनंद ठाकूर, प्रदीप मांजरेकर, मिलिंद खाड्ये, राजेश बांदेकर, सुरेश नेरूरकर उपस्थित होते.

काजूमुळे आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे. याच पार्श्वभूमीवर काजू प्रोसेसिंग युनिट धारकांची बैठक घेण्यात आली. त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. जिल्ह्यात छोटे मोठे सुमारे २५० पेक्षा जास्त काजू प्रक्रिया युनिट आहे. काजू बागायतदार अथवा शेतकरी यांच्याकडून काजू खरेदी करून त्यावर प्रोसेस करून काजू इतर देशात निर्यात केला जातो. या बैठकीत आम नितेश राणे यांनी मार्गदर्शन काजुमुळे आर्थिक क्रांती घडविली जाऊ शकते असे सांगितले. काजू प्रक्रियाधारक, काजू उत्पादक शेतकरी व काजू खरेदी विक्री मधील येणाऱ्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

मा. नितेश राणे साहेब यांनी बाजार समितीला व सिंधुदुर्ग बँक यांना एक मिटिंग जिल्हातील काजू प्रक्रियाधारक व जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन व सचिव यांची संयुक्त बैठक १५ फेब्रुवारीला घेण्याची सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांना केली व त्यावर योग्यतो निर्णय घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सूचित केले. तर मनीष दळवी व तुळशीदास रावराणे यांनी काजूमुळे जिल्ह्याचे अर्थकारण बदलू लागले असल्याचे मत व्यक्त केलं.

शेतकऱ्यांच्या काजू बियाला समाधानकारक भाव मिळाला पाहिजे. त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्नशील आहे. म्हणूनच काजू बियाचा दर निश्चित साठी जिल्हा बँक सभागृहात १५ फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 15 =