You are currently viewing सप्ताहाच्या माध्यमातून सहकार वाढवा! एम.के.गावडे

सप्ताहाच्या माध्यमातून सहकार वाढवा! एम.के.गावडे

सप्ताहाच्या माध्यमातून सहकार वाढवा! एम.के.गावडे

वेंगुर्ला

शासन आज विविध उद्योगासाठी आर्थिक सहकार्य करीत आहे. आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी आज सहकाराच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग करणे आवश्यक आहे. एकमेका सहाय्य करू यादृष्टीने सहकाराचे महत्व असून अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन सहकार वाढवून उद्योगाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नत्ती करावी, असे प्रतिपादन सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना व्यक्त केले.

जिल्हा उद्योग केंद्र ओरोस जिल्हा सहकारी बोर्ड, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काथ्या संस्था येथे सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले व एम. के. गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे सुभाष तळवडेकर, तालुका सहकार अधिकारी प्रशांत साळगावकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी आर. ए. गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे एम. आर. पांचाळ, महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, सुरज परब,

सावित्रीबाई फुले संस्थेच्या प्रविणा खानोलकर, सुरंगी महिला औद्योगिक संस्थेच्या सुजाता देसाई आदी उपस्थित होते. श्रीपाद दामले म्हणाले, विकास प्रक्रियेत सहकार हा महत्त्वाचा घटक असून जास्तीत जास्त उद्योगधंदे निर्माण झाले तरच विकास शक्य आहे. उद्योजक एम. के. गावडे, प्रज्ञा परब यांनी काथ्या उद्योगाच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यात साम्राज्य निर्माण केले आहे. नवउद्योजकांनी आपल्या कुटुंबाची प्रगती होईल यादृष्टीने शासनाच्या व जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन त्याचा योग्य विनियोग करून उद्योग करावा. सहकारातून छोटे मोठे उद्योग निर्माण झाल्यास आपला भारत देश आगामी काळात आणखी प्रगती करेल, असेही ते म्हणाले.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा