You are currently viewing “संस्कृती महाराष्ट्राची” अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

“संस्कृती महाराष्ट्राची” अंतर्गत दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

*”चिंतामणी कलामंच”चा सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणारा उपक्रम*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

“चिंतामणी कलामंच, मुंबई” तर्फे दिनांक १८ आणि १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी “संस्कृती महाराष्ट्राची” ह्या शीर्षका अंतर्गत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रकला स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि संक्रांत क्विन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

“संस्कृती महाराष्ट्राची” हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सहभागींसाठी आकर्षक भेटवस्तू तसेच विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू दिली जाणार आहे. रविवार, १८ फेब्रुवारी रोजी “भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२४” सकाळी ८ ते ११ ह्या वेळेमध्ये ८ ते १५ लहान गट आणि १६ च्या पुढे खुला गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होईल. आपलं चित्र ह्या ३ तासांमध्ये पूर्ण करायचं आहे.

दुपारी १ ते ३ खुल्या गटासाठी भव्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच “सक्रांत क्विन २०२४” या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अट फक्त एकच काळ्या रंगाची साडी परिधान करणे आवश्यक आहर. सदर स्पर्धा खुल्या गटासाठी सायंकाळी ५ ते ९ ह्या वेळेत आयोजित केलेली आहे.

तसेच सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी “भव्य राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा २०२४” सकाळी १० ते सायं ६ वा. ह्या वेळेमध्ये ८ ते १५ लहान गट आणि १६ ते ३० मोठा गट अशा दोन गटांमध्ये आयोजित केलेली आहे. सादरीकरणासाठी जास्तीतजास्त ३ मिनिटे दिली जाणार आहेत. सर्व स्पर्धा जोगळेकर वाडी, बी.एम.सी. शाळा, नेहरु उद्यान, जोगळेकर वाडी, सायन (पू.), मुंबई  ४०००२२ येथे आयोजित केल्या जाणार आहेत. नाव नोंदणीसाठी पूजा मोहिते – ७७०००९६१९७ किंवा प्रथमेश पिंगळे – ७२०८८०१५१० यांच्याशी संपर्क साधू शकता.

चिंतामणी कला मंच, मुंबई ही संस्था २०१७ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम घेत आहे. गरीब मुलांसाठी कार्यरत असणारी ही संस्था आहे. मुलांमध्ये असणार्‍या विविध कलांना प्रोत्साहन देण्यावर तसेच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकासावर कशाप्रकारे अधिक उत्तम कार्य करता येईल यासाठी प्राधान्य दिले जाते.

चिंतामणी कलामंच या संस्थेमार्फत वर्षभरात अनेक राज्यस्तरीय उपक्रम, स्पर्धा राबवल्या जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मुलांना एक रंगमंच मिळावा, प्रतिभावंत मुले घडावी या उद्देशातून या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भरवल्या जातात.

महाराष्ट्रातल्या गृहिणींच्या अंतरंगातही विविध सुप्तगुण दडलेले अाहेत. त्यांच्यातल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, गृहिणींचे मनोबळ वाढवणे, महिलांना आणि तळागाळातील मुलांना प्रोत्साहन मिळावे हाच यामागचा उद्देश आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करणे हेच संस्थेचे स्वप्न आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा