You are currently viewing लोकाभिमुख तलाठी श्रीमती चिंदरकर सेवानिवृत्त

लोकाभिमुख तलाठी श्रीमती चिंदरकर सेवानिवृत्त

तहसीलदार यांच्या दालनात निरोप समारंभ, नारायण राणे यांची उपस्थिती

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तलाठी श्रीमती एस. आर. चिंदरकर या सेवानिवृत्त झाल्या. सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या दालनात शिवसेना नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, युवा नेते साईप्रसाद राणे आदी उपस्थित होते.
इन्सुली गावात तलाठी म्हणून श्रीमती चिंदरकर यांनी लोकाभिमुख काम केलं होतं. सावंतवाडी मंडळ अधिकारी म्हणून देखील त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. सेवानिवृत्त झाल्यावर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 6 =