You are currently viewing श्री टागोर शिक्षण संस्थेचा चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

श्री टागोर शिक्षण संस्थेचा चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

इंद्रायणी नगर, भोसरी-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

श्री टागोर शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर इंद्रायणी नगर भोसरी पुणे या विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ या वर्षांमध्ये विद्यालयातील इयत्ता सातवी ते नववी इयत्ताचे एकूण ६६ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.

परीक्षेमध्ये विद्यालयाचा A ग्रेडमध्ये अनिकेत गोरख आगे हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. तर बी ग्रेडमध्ये खुशी वरठे,राऊत ज्ञानेश्वरी ,धीरज दुर्गा काळे , शिवानी सपकाळ,समीक्षा शिंदे, वेदांत पैठणकर, श्रावणी बादोले, मानसी पाटील ,सिद्धार्थ गर्दनमारे, आदित्य तूपसौदर, लोकेश मदने, विद्यार्थी उत्तीर्ण झाले .सी ग्रेड मध्ये एकूण वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

श्री टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन श्री नंदकुमार लांडे पाटील व उपाध्यक्ष महेश घावटे , संस्थेचे सचिव सुरेश फलके ,युवराज बापू लांडे सुरज लांडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज लांडे, दत्तोबा लांडे,सुधीर लांडे ,रोहिदास लांडे या मान्यवरांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे सहशिक्षक श्री. सतीश क्षीरसागर यांचे मोलाचे अध्यापन ,मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील सहशिक्षक यांनी देखील खूप कष्ट केले . सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री हनुमंत आगे व संतोष काळे यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 13 =