You are currently viewing कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योग पडताहेत बंद

कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योग पडताहेत बंद

*कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे लघुउद्योग पडताहेत बंद*

*तळवडे येथील वीज ग्राहकांच्या बैठकीत वीज ग्राहकांनी मांडल्या तक्रारी*

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची बैठक ग्रामपंचायत सभागृह, तळवडे येथे शनिवारी सायंकाळी ४.०० वाजता पार पडली. तळवडे येथील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायण(बाळा) जाधव व सरपंच, ग्रामपंचायत तळवडे यांच्या सहकार्याने सदरची बैठक आयोजित केली होती. यावेळी तळवडे येथे महावितरण कडून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने गावातील लघुउद्योग बंद पडत आहेत. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प पाडून नुकसान होत आहे. असा तक्रारींचा सुर वीज ग्राहकांकडून ऐकू आला. या बैठकीसाठी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका समन्वयक बाळ बोर्डेकर, वेंगुर्ला तालुका सचिव जयराम वायंगणकर, तालुका कार्यकारिणी सदस्य रामचंद्र राऊळ, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायण जाधव, व्यापारी संघ तळवडे अध्यक्ष गंगाराम परब आदी उपस्थित होते.
तळवडे येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायण जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी तळवडे येथे कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने 65kv क्षमता असलेला ट्रान्सफॉर्मर काढून 100kv क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरण विरोधात २६ जानेवारी रोजी उपोषण छेडले होते. त्यावेळी महावितरणने थातूरमातूर उत्तर दिल्याने तंटामुक्ती अध्यक्ष नारायण जाधव यांनी वीज ग्राहक संघटनेकडे कैफियत मांडली, आणि तळवडे गावातील वीज समस्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत तळवडेच्या सहकार्याने वीज ग्राहक संघटनेची बैठक आयोजित केली होती.

*ग्राहकांनी मांडल्या कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी*
वीज ग्राहक विजय काणेकर, प्रशांत रेडकर, लवू रेडकर (गोठावडे वाडी), सुरेश मांजरेकर (मांजरेकर वाडी) यांनी गावात 130/150 kv दाबाने पुरवठा होत असून काहीवेळा बल्ब सुद्धा अंधुक पेटतात. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाचा खोळंबा होतो, एक पंप सुरू केला असता दुसरा चालत नाही, पंपाचे स्टार्टर उडतात अशा तक्रारी मांडल्या तर तंटामुक्ती समिती अध्यक्ष नारायण जाधव यांनी महावितरणचे अधिकारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी डीपीडीसी म्हणजे जिल्हापरिषदच्या फंडातून निधी आणा असे सांगतात, जो निधी गावच्या विकासासाठी असतो तो निधी मागण्याचा महावितरणला अधिकार नाही, तर महावितरण हे स्वतंत्र महामंडळ आहे, त्यांची विजेची बिले ते स्वतः वसूल करतात परंतु स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी डीपीडीसी चे नाव पुढे करून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता कार्यालय व कुडाळ येथील मुख्य कार्यालयात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 65kv क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर 100 kv करण्यासाठी निवेदन दिले असूनही महावितरणकडून योग्य ती कार्यवाही केली जात नसल्याची खंत व्यक्त केली. गावातील वायरमन देखील कामात दिरंगाई करत असून फोन उचलत नसल्याची तक्रार सर्वच वीज ग्राहकांनी मांडली. अशा अनेक तक्रारींचा पाढा वीज ग्राहकांनी संघटनेकडे वाचला. तळवडे गावात जवळपास 20/25 ट्रान्सफॉर्मर आहेत परंतु, गावात होणारा वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने कात निर्मिती सारखे लघुउद्योग, व्यापार, व्यवसाय बंद पडण्याची वेळ आली आहे, असे सांगत तळवडेसाठी मंजूर असलेलं सबस्टेशन लवकरात लवकर निरवडे येथे उभारण्याचा प्रयत्न करून गावातील वीज समस्या दूर करण्याचा प्रयत्न व्हावा अशी मागणी वीज ग्राहक संघटनेकडे केली आहे.
वीज ग्राहक संघटनेने वीज ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेत येत्या पंधरा दिवसात वीज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा वीज ग्राहकांची बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे तळवडे गावाचा विस्तार पाहता तळवडेसाठी स्वतंत्र विभागीय वीज ग्राहक संघटना स्थापन करण्या बाबत विचार करावा असेही वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात आले. यावेळी जालिंदर परब, शामसुंदर रेडकर, श्यामसुंदर कुंभार, शिवराम रेडकर, प्रदीप लोके, दिनेश परब, अशोक रेडकर, श्याम शेटकर, विष्णू मेस्त्री, गणेश कर्पे आदी वीज ग्राहक उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा