You are currently viewing वैभव नाईक यांचे डावे-उजवे आमच्या संपर्कात – रुपेश पावसकर

वैभव नाईक यांचे डावे-उजवे आमच्या संपर्कात – रुपेश पावसकर

वैभव नाईक यांचे डावे-उजवे आमच्या संपर्कात – रुपेश पावसकर:

कुडाळ

महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा भेट देत नव्हते तेव्हा वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघासाठी निधी आणत होते. त्यामुळे वैभव नाईक यांना कोणीतरी लिहून देणार आणि आपण थेट
मीडीयासमोर मांडण्यापूर्वी वाचून मनाला पटते का त्याची खात्री करावी. वैभव नाईक यांचे डावे- उजवे आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी काल आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्ह्यात शिंदे गटाचे अस्तित्व नाही असे वक्तव्य केले. वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. तसेच ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्याना सांभाळू शकत नाहीत. यामुळे ते असे बेताल वक्तव्य करत आहेत. आमच्या शिंदे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर असंख्य कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. हे सर्व उबाठाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे वैभव नाईक यांनी आपले आत्मपरीक्षण करावे. तसेच पक्षातील गळती ते थांबवू शकले नाहीत हे त्यांचे अपयश आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचा उमेदवार हा ३ लाख एवढे मताधिक्य घेऊन निवडून येईल. त्याचप्रमाणे आमचे मंत्रिबदीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहेत. त्यांनी जिल्ह्याचा आराखडा १९० कोटी एवढा भरीव केला. जिल्ह्यात काथ्या उद्योगसारखे प्रकल्प हे दीपक केसरकर यांनी आणलेत. दीपक केसरकर यांनी बोलण्याचा नैतिक अधिकार वैभव नाईक यांना नाही. शिंदे गटाचा भव्य मेळावा हा सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी म्हणजेच राजापूर येथे राजीव गांधी मैदान येथे झाला. यावेळी बोलताना संजय पडते हे देखील बोलले की, खासदार विनायक राऊत हे वैयक्तिक मदत करतात. त्यांनी किती लोकांना मदत वैयक्तिक मदत केली ते जाहीर करावे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना शिंदे यांचे नेतृत्व मान्य असल्याने शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणावर उबाठाचे कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत, असेही रुपेश पावसकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − three =