You are currently viewing स्मृति भाग ४०

स्मृति भाग ४०

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ४०*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

” संयमीत जीवन , सात्विक आहार आणि भक्तिपूर्ण विचार असतील तर त्या घरात तेजस्वी बालके जन्माला येतात ! ” असे थोरांचे सांगणे आहे . रघु राजापासून या सद्गुणांची परंपरा म्हणून ” श्रीराम ” जन्मले असावेत ! भारतीय जनमानसासाठी जिजामातेचे आतडे तुटले म्हणून शिवाजी !! आता , स्त्रीचे समर्पण आणि पुरुषाचे कर्तृत्व या दोहोंचे मिश्रण म्हणजे संसार ! याचाच विसर पडलाय ! १)शरीर संपत्ती , २)आनंददायी विद्या , ३)यशस्वी धन , ४)अनुकूल स्त्री , ५)जीवनाची निश्चिंतता व ६)कृतज्ञ पुत्र ही भौतिक जीवनाची सहा तोंडे असतात , हेच माणूस वा स्त्री विसरलेले आहेत ! धर्माला मंदिरात वा कर्मकांडात बंद न करता जीवनात उतरवण्याची गरज आहे , हे नरनारी विसरले आहेत . ज्ञान हे प्रत्येक मानवमात्रांपर्यंत पोहोचले पाहिजे , हे कुणालाच समजत नाही ! जे शिकवले जाते ते “शिक्षण ” व जो उचलला जातो तो ” संस्कार ” . लग्न होवून घरी येणार्‍या स्त्रीला सगळे लक्ष्मी संबोधतात त्या घरची . पण लक्ष्मी जेंव्हा भोगाबरोबर येते तेंव्हा माणूस अविवेकी बनण्याची शक्यता असते . ती जेंव्हा लोभाबरोबर येते तेंव्हा तो कंगाल बनण्याची शक्यता असते व ती जेंव्हा नारायणासह येते तेव्हा ती महालक्ष्मी होते !! हे सर्व थोर पुरुष सांगतात आणि आपण पद्धतशीरपणे विसरतो !!! नारायणासह म्हणजे डोक्यात देव आणि हृदयात पति असेल तर संसार सुखाचा नाही होणार का ?

 

” या कारणे गृहस्थाश्रम । सकळांमध्ये उत्तमोत्तम ।

परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया ।।”

रामदास स्वामी .

” भारतीय संस्कृतीतील गृहस्थाश्रम हा मोक्षाकडे जाण्याचा एक मार्ग आहे . आसक्तिमय प्रेमातून शेवटी अनासक्त प्रेम निर्माण करावयाचे आणि संसारातच मोक्षश्री आणावयाची ” हे सानेगुरुजी सांगतात .

विवाह , संस्कार , गृहस्थाश्रम , विवाह संस्कार , विवाह संस्था या शब्दांवर ग्रंथ तयार होतील ! असे शब्द आहेत . आणि भारतीयांजवळील बुद्धिमत्ता या ग्रंथांचे देणे पुन्हा माझ्या बांधवांना देईल , अशी आशा बाळगून पुढे ” ताडन ” शब्द पाहू .

माझ्या नजरेत ताडनाचे पाच प्रकार ! १)नेत्रताडन , २) वाक्ताडन , ३)हस्तताडन , ४)लत्ताप्रहार , ५)साधनताडन ( यात मारण्यासाठी काही बाह्यसाधनांचा उपयोग केला जातो ) . शिवाय हे प्रकारही महत्वाचे १) क्रौर्यरहित ताडन व २) क्रौर्यसहित ताडन . १)ममत्व राखत व २) ममत्व न राखत . १)मृदु व २)प्रखर . ज्याची स्त्री त्याने ठरवावं कसं वागावं ! दुसर्‍यास वादात पडण्याचा काय अधिकार ? नवराबायकोचे वादात तिसरा कुणी पडत असेल तर तो दोषी आहे !! आजची स्त्री ही टक्केवारीत ९५% प्रथम दोन प्रकारातच समजते , कारण तिलाही संसार टिकवायचा असतो व फुलवायचा असतो . बाकी तीन प्रकारच्या ताडनाची आज सहसा गरज पडत नाही . बाकी तीन प्रकार हव्यास व लोभामुळे घडत असावेत !! पुन्हा आजचे विचार घटस्फोटाकडे झुकलेले ! आणि ताडनापेक्षा बर्‍याच स्त्रिया ह्या समजूत घातली तर ऐकण्याच्या तयारीत असतात . शिवाय पूर्वी अति बाल वयात लग्न होत असल्यामुळेही ताडनाचा पर्याय दिलेला असावा !

पुन्हा स्त्री , नारी , महिला , अबला , सैरंध्री , पुरंध्री , ललना , तसेच बाई , पत्नि , अर्धांगिनी , पतिव्रता , सहधर्मचारिणी इ . स्त्रीत्वाच्या सर्व छटांमध्ये वा वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळी वर्तणूक बर्‍याचदा घडतेच . पुन्हा स्त्रीचे स्वाभाविक दुर्गुणांना शुक्राचार्य वा विदुरांनी महाभारतात वर्णित करुन ठेवले आहे . आता शुक्राचार्य हे असुरांचे गुरु व विदुर हे कुरु वंशीय क्षत्रिय बरं ( राजकारण्यांनी इथे ब्राह्मणांवर दोषारोपण अजिबात करु नये ) !

 

*अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता ।*

*अशौचं निर्दया दर्पः स्त्रीणामष्टौ स्वदुर्गुणा ॥*

~~शुक्रनीति , अ. ३ , १६६ .

१) खोटे बोलणे , २)साहस ( सहज कुठलंही कार्य अविचाराने करणे ) , ३)माया ( ढोंग ) , ४)मूर्खता , ५)अत्यंत लोभ , ६)अपवित्रता , ७)निर्दयता आणि ८)दर्प ( अहंकार ) हे आठ दुर्गुण स्त्रीत स्वाभाविक असतात .

आणि या गुणांव्यतिरिक्त जर स्त्री असेल तर ताडनाची गरजच काय ? काही चुकल्यास सांगावे .

अजून काय सांगू ? या विषयाला पैलू बरेच आहेत ! बाकी स्मृति अपूर्ण नको रहायला !! आज थांबतो . विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा