You are currently viewing सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे व दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्याकडेला उन्हाताणात बसून आपली सेवा जनतेला देत असतात. या व्यावसायिकाना उन, वारा व पाऊस यापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहाय्यक अनुदानावर गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजना शासन निर्णयानुसार कार्यान्वित केले आहे. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर गटई स्टॉल व संत रोहिदास चर्मदयोग व चर्मकार विकास महामंडळ यांच्यामार्फत रक्कम रु.500/- रोख अनुदान देण्यात येते आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग -416812 या कार्यालयाशी संपर्क साधावा.

योजनेच्या नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. कुंटुबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात रु.40,000/- व शहरी भागात रु.50,000/- पेक्षा अधिक नसावे. (यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.) अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड (कॅन्टॉन्मेंट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकिची असावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − ten =