You are currently viewing जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचा उपक्रम

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचा उपक्रम

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचा उपक्रम

चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत  30  जानेवारी  ते 1 फेब्रुवारी दरम्यान ‘चाचा नेहरु बाल महोत्सव – 2023-24’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा,ओरोस येथे  होणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत, महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील इतर मुले व बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मर्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाब, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव-2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे.

          या महोत्सवामध्ये मुले व मुली वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये सहभागी होणार असून यामध्ये वैयक्तिक नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, सामुहिक नृत्य, लांब उडी, कॅरम, बुध्दीबळ, गोळा फेक, कब्बडी, खो खो, रिले, क्रिकेट, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धाचे आयोजन केलेले आहे. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − two =