You are currently viewing *महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन

*महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन

*महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन*

वेंगुर्ले

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . भाजपाच्या वतीने २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत डाॅ . भिमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ” संविधान गौरव पंधरवडा ” आयोजित करून आदरांजली वाहण्यात आली .

यावेळी मार्गदर्शन करताना लखमराजे भोसले म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जातीभेद , लिंगभेद आणि वर्गभेद या विरुद्ध लढा देणारे समाज क्रांतिकारक आणि वंचितांच्या कल्याणाचा वसा घेतलेले राजकारणी म्हणून जगभर लौकिक आहे . त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलुपैकी एक महत्वाचा पैलु म्हणजे , ते एक निष्णात अर्थतज्ञ होते .

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाल्या , मोदी सरकारने संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी करुन बाबासाहेबां बद्दल असलेला आदर द्विगुणित केला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांना केले .

यावेळी जिल्हा का. का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल ,  ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , नगरसेविका  श्रेया मयेकर , शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे व निलेश मांजरेकर , ता. चिटणीस जयंत मोंडकर , युवा मोर्चाचे हेमंत गावडे – कृष्णाजी सावंत – मारुती दोडशानट्टी – तन्मय जोशी , महीला मोर्चाच्या कार्तीकी पवार व स्वरा देसाई , जेष्ठ कार्यकर्ते मनोहर होडावडेकर गुरुजी , महेश धुरी , प्रशांत धुरी , सुनील मठकर , सुरेश धुरी इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा