You are currently viewing रेल्वे टर्मिनस प्रश्नी आंदोलनाला ठाकरे शिवसेनेसह मनसेचेही उपस्थित राहण्याचे आवाहन

रेल्वे टर्मिनस प्रश्नी आंदोलनाला ठाकरे शिवसेनेसह मनसेचेही उपस्थित राहण्याचे आवाहन

रेल्वे टर्मिनस प्रश्नी आंदोलनाला ठाकरे शिवसेनेसह मनसेचेही उपस्थित राहण्याचे आवाहन

उद्या होणार मळगाव रेल्वे स्टेशनला आंदोलन…

सावंतवाडी

कोकण प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी टर्मिनस प्रश्नी उद्या आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेसह मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी केला आहे. याबाबतची प्रसिद्धी पत्रके त्यांच्याकडून देण्यात आली आहेत.

यात म्हटले आहे की, गेले अनेक वर्ष हा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. कोकण रेल्वे संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eight =