You are currently viewing ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक किल्ले यशवंतगडावर धार्मिक भावना पायदळी तुडवून करीत असलेल्या बांधकामाला विरोध

ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक किल्ले यशवंतगडावर धार्मिक भावना पायदळी तुडवून करीत असलेल्या बांधकामाला विरोध

*ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक किल्ले यशवंतगडावर धार्मिक भावना पायदळी तुडवून करीत असलेल्या बांधकामाला विरोध:-*

दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी किल्ले यशवंतगडाच्या पायथ्याशी शिवप्रेमी कै.श्री राजन रेडकर व श्री भूषण मांजरेकर ह्यांनी गडाच्या भिंतीला धोका पोहोचवून व्यावसायिक वापरासाठी पर्यटनाच्या नावाखाली करण्यात आलेल्या हॉटेलच्या बांधकामाला विरोध दर्शवून गडाचे अस्तित्व व इतिहास टिकवण्याच्या दृष्टीने गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी केले गेलेले जगातील पहिले बेमुदत आमरण उपोषण होते. तब्बल आठ दिवस चाललेल्या त्या उपोषणाची दखल संबंधित पुरातत्व विभाग,वनविभाग,महसूल तथा तहसील विभाग,किनारपट्टी नियमन क्षेत्र विभाग (CRZ) ह्या शासकीय विभागांनी घेऊन संबंधित बेकायदेशीर बांधकामावर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी घेऊन सदर यशवंतगडावरील ऐतिहासिक उपोषण शिवप्रेमींकडून यशस्वीरित्या पूर्ण केले गेले होते.
सदर बांधकाम थांबलेले असून सध्या न्यायप्रविष्ठ असतानाच आता नव्याने पुन्हा एकदा दस्तूरखुद्द पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने असेच व्यावसायिक बांधकाम करण्यास सुरुवात करताना दिसत होते. ह्या बांधकामाबाबत रेडी येथील सौरभ नागोळकर व आरोंदा येथील अभिषेक रेगे ह्यांना विश्वासात घेऊन रेडी येथील किल्ले यशवंतगडावर स्वच्छता गृह,राहण्यास खोल्या व न्याहारीगृह(कॅफे) असे व्यावसायिक बांधकाम बांधण्याच्या उद्देशाने पुरातत्व विभागाचे अभियंता श्री शांताराम केंकडे यांनी दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी जागेची पाहणी केली होती. सदर बांधकामासाठी तटबंदी शेजारी प्रवेशद्वारासमोर जागेची निश्चिती करून संबंधित जागा मालक तथा कुळ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या ह्या जागेत हे बांधकाम करू नये असे सांगितले.
त्यानंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी रेडी येथील स्थानिक ठेकेदार समीर कनयाळकर यांनी रेडी येथील कामगारांना घेऊन किल्ले यशवंतगडाच्या आतील असलेल्या राज्याच्या देवाच्या घुमटीच्या बाजूलाच बांधकाम करण्याच्या उद्देशाने साफसफाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गडावर संवर्धनासाठी येणारे शिवप्रेमी भूषण मांजरेकर,रोहन सावंत व त्या जागेतील कुळ अमित सावंत यांनी कंत्राटदार समीर कनयाळकर यांना सदर बांधकामाबाबत विचारणा केली असता सदर बांधकामाबाबत कोणते कागदपत्र आपल्याकडे नसून अभिषेक रेगे,आरोंदा यांच्याकडे सर्व कागदपत्रे व बांधकामाची सर्व माहिती दिलेली आहे, असे सांगून मे.सुलभ इंटरनॅंशनल सोशल सर्व्हिस ऑगनायझेशन मुंबई,च्या संजीव सिंग नामक व्यक्तीशी स्वतःच्या मोबाईल वरून फोन लावून दिला. सिंग ह्यांना ह्याबाबत विचारणा करून माहिती मागितली असता त्यांनी देखील ती व्यवस्थित दिली नाही व सदर माहिती अभिषेक रेगे ह्यांना दिलेली आहे असे सांगितले. तसेच सदर बांधकाम हे किल्ल्याच्या आत असून राज्याच्या देवाच्या घुमटीला लागूनच असल्याने छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या पवित्र भूमीत भूषण मांजरेकर, रोहन सावंत व कुळ अमित सावंत यांनी धर्म भावना जपत हे बांधकाम आपण करू नये व वेळीच थांबवावे. तसेच सदर बांधकामाची रीतसर सर्व कागदपत्रे आम्हास दाखवावी,असे सांगून ते काम तूर्तास रोखले.
त्यानंतर पुरातत्व विभागाचे शांताराम केंकडे यांनी भूषण मांजरेकर ह्यांना कॉल करून बांधकाम रोखण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बांधकाम हे गडाच्या व देवस्थानाच्या हद्दीत करणार असल्याचे तसेच त्यामध्ये स्वच्छता गृह, स्नानगृह,राहण्यास खोल्या,न्याहारी गृह(कॅफे) अश्या स्वरूपाचे RCC प्रकारचे बांधकाम २० मीटर क्षेत्रात करीत असल्याचे सांगितले. त्यावर भूषण मांजरेकर यांनी त्यांना सदर बांधकामातील कॅफे हा व्यावसायिक स्वरूपातील असल्याने आपण तो करू नये. स्थानिक ग्रामस्थांची गावात उत्तम सोय सुविधा असलेली उपहारगृहे व राहण्यास योग्य हॉटेल उपलब्ध असल्याने लोकांची गैरसोय होण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. तसेच स्वच्छतागृह,स्नानगृह ह्यासाठी फिरते शौचालय, फायबर मुतारी,मॉड्युलर टॉयलेट/युरीनल,ACP शीट्स टॉयलेट्स ह्यांसारखे फायबर तसेच इतर तत्सम वापरास व कमी जागेत सोयीस्कर बांधकामास सोपे असलेले पर्याय असून ते समर्थता दर्शवल्यास उपलब्ध देखील करून देण्याबाबत हमी दिली. परंतु RCC बांधकाम आपण ह्या पवित्र भूमीच्या आत करूच नये असे सांगितले व त्या संबंधित बांधकामाची सर्व माहिती व कागदपत्रे दाखवावीत अशी मागणी केली. परंतु ती अद्याप पर्यंत दाखवायची तसदी पुरातत्व विभागाने घेतलेली नाही व ज्यांना ह्याबद्दल माहिती दिली आहे असे सांगितले गेले, त्या अभिषेक रेगे यांनी देखील कोणत्याच प्रकारची सदर बांधकामाबाबतची माहिती इतर स्थानिक शिवप्रेमी व कुळ असलेल्या अमित सावंत,रोहन सावंत व इतरांना अद्याप दिलेली नाही.
त्यानंतर शांताराम केंकडे यांनी फोन करून ग्रामपंचायत कार्यालयात रोहन सावंत यांना सरपंच रेडी यांच्यासमवेत बसून सदर विषयावर बोलून तोडगा काढण्यासाठी बोलावले. गेल्या वेळी उपोषण झालेल्या बेकायदेशीर बांधकामाला दिलेल्या छुप्या परवानगीमुळे झालेल्या त्रासाचे व स्थानिक ग्रामस्थांच्या,शिवप्रेमींच्या,जमीन कुळांच्या विरोधाचा व धार्मिक भावनेंचा आदर राखून सरपंच रेडी ह्यांनी देखील ह्यात स्थानिकांच्या बाजूने राहून सदर बांधकामाबाबत विरोधी भूमिका दर्शवली.
किल्ले यशवंतगडावरील राज्याच्या देवाच्या घुमटीला लागूनच सदर बांधकाम जबरदस्तीने करवुन धार्मिक भावना दुखवू पाहणाऱ्या व महाराजांच्या गडाच्या संरक्षणाची असलेली जबाबदारी लक्षात घेता शिवप्रेमी भूषण मांजरेकर व रोहन सावंत ह्यांनी सदर बांधकामाला तीव्र विरोध दर्शवला असून सदर बांधकामासाठी जो निधी वापरला जाणार आहे.तो निधी गडाचे जे पुरातन अमूल्य बांधकाम तटबंदी, सभागृह, भिंती कोसळत आहेत, त्यासाठी हा निधी त्वरेने वापरावा व गडाचे गडपन राखावे ही प्रामाणिक मागणी केली आहे. तसेच रेडी गावात राहावयास,जेवण नाश्ता करण्यासाठी पर्यायी उत्तम सोय स्थानिक ग्रामस्थांची असून देखील मुद्दामहून असे बांधकाम करून त्यांच्या पोटावर पाय आणू पाहणाऱ्यांचा रेडी ग्रामस्थांच्या वतीने निषेध असेल व ह्या चुकीच्या बांधकामाला विरोधच असेल असे रोहन सावंत यांनी म्हटले आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा