You are currently viewing २४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

२४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी येथील रोटरी क्लब सावंतवाडी आणि मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वीस,तेरा, नऊ वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे

दरम्यान सकाळी 09.00 वाजता स्पर्धेचे उ‌द्घाटन करण्यात येईल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी रू. 50 घेण्यात येईल. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, जन्मतारिख, ठिकाण आणि आधारकार्ड 9422054948 (श्री. आबा कशाळीकर) या मोबाईल कमांकावर वॉटस् ॲपद्वारे शनिवार दि. 23 डिसेंबर सायंकाळी 07:00 वाजेपर्यंत पाठवायची आहेत.

मर्यादित स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. राष्ट्रिय बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तीन गटात स्पर्धा खेळविण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा