You are currently viewing ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्रातून ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ प्रथम

६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-३ केंद्रातून ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ प्रथम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-३ केंद्रातून सहप्रमुख कामगार अधिकारी (पश्चिम उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका या संस्थेच्या ‘जेंडर अॅन आयडेंटीटी’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच स्वराज्य फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘द फियर फॅक्टर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-३ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:- उपप्रमुख कामगार अधिकारी (पुर्व उपनगरे) बृहन्मुंबई महानगरपालिका या संस्थेच्या ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक राजेंद्र पोतदार (जेंडर अॅन आयडेंटीटी), द्वितीय पारितोषिक समीर पेणकर (द फियर फॅक्टर), प्रकाश योजना: प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (एलिजीबीलीटी), द्वितीय पारितोषिक संजय तोडणकर (अरण्यदाह), नेपथ्य: प्रथम पारितोषिक पंकज वेलिंग (जेंडर अॅन आयडेंटीटी), द्वितीय पारितोषिक रजनिश कोंडविलकर (पुढच्या वर्षी लवकर या), रंगभूषा: प्रथम पारितोषिक राजेश परब (एलिजीबीलीटी), द्वितीय पारितोषिक आनंद एकावडे (सखी उर्मिला) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक: अमित वैती (जेंडर अॅन आयडेंटीटी) आणि बकुळ धवने (द फियर फॅक्टर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे: सविता चव्हाण (साठा पत्तौत्तराची कहाणी असफल अपूर्ण), इशा कार्लेकर (चाफा बोलेना), सोनाली जानकर (रुद्राक्षा), भारती पाटील (पुढच्या वर्षी लवकर या), मृदूला अय्यर (पुढच्या वर्षी लवकर या), अमित सोलंकी (एलिजीबीलीटी), सुचित ठाकूर (अरण्यदाह), सचिन पवार (जेंडर अॅन आयडेंटीटी), महेंद्र दिवेकर (साठा पत्तौत्तराची कहाणी असफल अपूर्ण), गौरव सातपुते (द फियर फॅक्टर)

साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे दि. १६ डिसेंबर, २०२३ ते ८ जानेवारी, २०२४ या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. राजीव मोहोळ, बाळ बरगाळे आणि गौरी लोंढे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम आणि द्वितीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा