You are currently viewing ओवळीयेत घराला लागलेल्या आगीत आंगणे परिवाराचे लाखोचे नुकसान

ओवळीयेत घराला लागलेल्या आगीत आंगणे परिवाराचे लाखोचे नुकसान

ओवळीयेत घराला लागलेल्या आगीत आंगणे परिवाराचे लाखोचे नुकसान..!

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ओवळीये येथील श्री. नंदकुमार आंगणे यांच्या घराला काल १५ जानेवारीला मध्यरात्री भयानक आग लागली. आंगणे परिवार त्यावेळी झोपेत असल्याने बेसावध होते. जागे होताच त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या आणि लगतचे गांवकरी मदतीसाठी धावले. या नंतर मिळेल त्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात आला तरिही आग शमत नव्हती. जोपर्यंत आग आटोक्यात आली तोपर्यंत घर व घरातील साहित्य जळून खाक झाले. घराला आग लागल्याचे कळताच नंदकुमार आंगणे हे आई, पत्नी व मुलगा यांसह प्रसंगवधान राखत घराबाहेर आले. घराला लागून असलेल्या गोठ्यात पाळीव गुरे ढोरे होती. त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र भडकलेल्या आगीत शेतकरी कुटुंबीय असलेल्या मनोहर आंगणे यांचे घर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 15 =