You are currently viewing माझी आठवण येईल का ?

माझी आठवण येईल का ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा ताई पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी आठवण येईल का?*

 

आयुष्याच्या उतरत्या वळणावर वाटचाल करतांना शरीर थकलेले व मन थोडे अस्थिर असतांना कुणी तरी आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अस सारखं वाटत असतांना खूप जणांना हा प्रश्न पडतो *माझी आठवण येईल का?* अगदी नैसर्गिक आहे हा प्रश्न! साहित्यिक उपक्रम लिहिण्यासाठीही हा प्रश्न चांगला आहे ! अनेक पैलूं वर हा प्रश्न विचारता येईल व सुंदर अशी उच्च साहित्य कृती कवी व लेखकाच्या लेखणीतून निर्माण होईल ! पण प्रत्यक्ष जीवनाचा विचार करतांना माझे स्वतःचे प्रांजळ मत आहे की हा प्रश्न चुकीचा आहे’जन्माला

आल्यापासून. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत मनुष्याला विविध अनुभव येतात.विविध

प्रकारच्या नात्यांनीअनेक भावबंध निर्माण होतात काही निरपेक्ष तर काही अपेक्षारहित!कितीतरी घटना, प्रसंग मानवी जीवनात सतत घडत असतात. अनेक नात्यांच्या कोमल परंतु चिवट धाग्यांनी मनुष्याच्या जीवनाचे वस्त्र विणलेले असते आई वडील : पती पत्नी बहिणभाऊ– मित्र आणि शत्रू सुद्धा! किती नाती सांगावीत? ,

त्या अनुषंगाने मनाच्या कप्प्यात साठविलेल्या अनेक आठवणी! ह्या आठवणींच्या गाठोड्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असलेली! काही आठवणी मनाला सुख देणाऱ्या आनंद देणाऱ्या !पुन्हा पुन्हा आठवत राहावे अशा! तर काही नकोशा वाटणाऱ्या! आठवणींचे हे मोहोळ एकदा जागृत झाले की मनुष्याचे मन त्यात पूर्णपणे गुंग होते सगळ्या आठवणी सुरक्षित असतात! खोलवर रुजलेल्या !

फक्त प्रसंगानुसार विशिष्ट परिस्थितीनुसार गाठोड्यातील आठवणी बाहेर निघतात! व पू च्या मते आठवणी ह्यामुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात.वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील ह्याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग

एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात

आठवणींचे तसेच आहे त्यामुळे माझी आठवण येईल ना हा प्रश्न माझ्या मते तरी पूर्णपणे चुकीचाआहे . कारण आठवण विस्मरणात कशी जाणार ? विशिष्ट वेळी विशिष्ट प्रसंगी योग्य आठवणगाठोड्यातून हलकेच आपल्याही नकळत बाहेर येते जीवनाच्या ह्या वस्त्रात विणलेले आठवणींचे धागे इतके कच्चे थोडे असतात ? कच्च असतं आपलं मन !अनेक कारणांनी हळवं झालेलं?

कोणी कुणालाविसरत नाही विसरुच शकत नाही !थोडी धूळ असते तीही कारणपरत्वे !ती झटकली की झालं!

माझी आठवण येईल का? हा प्रश्न मनात आल्यावर किंवा दुसऱ्याला विचारतांना आपण आपल्या मनालाच हा प्रश्न विचारावा की आपण तरी काही विसरलो आहे का?मनात दडलेल्या आठवणी प्रसंगानुसार भराभर बाहेर येतात व अगदी बारीक तपशीलासह डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात ! खरंय ना हे?

त्यामुळे माझी आठवण येईल का हा प्रश्न चुकीचा आहे हे पटलं ना आता?

मला स्वतःला तर कधीच नाही वाटत असं !मी नाही विचारत कधीच — माझी आठवण येईल ना?

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

९४२१८२८४१३

 

 

*संवाद मिडिया*

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

*ADVT LINK👇*

————————————————
🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

👉 आजच खरेदी करा…📝

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

📱9289922336, 7666212339
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा