You are currently viewing भेडशीतील युवा उद्योजक बाबा टोपले यांची पंचक चित्रपटामध्ये डॉक्टरची भुमिका ठरली लक्षवेधी

भेडशीतील युवा उद्योजक बाबा टोपले यांची पंचक चित्रपटामध्ये डॉक्टरची भुमिका ठरली लक्षवेधी

भेडशीतील युवा उद्योजक बाबा टोपले यांची पंचक चित्रपटामध्ये डॉक्टरची भुमिका ठरली लक्षवेधी

*डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने  मराठी प्रेक्षकांसाठी आणला पंचक चित्रपट*

दोडामार्ग

कोकणाला जशी निसर्गाची भरभरून देणगी मिळालेली आहे त्याप्रमाणेच अनेक घटकांमध्ये विशिष्ट कलागुण संपन्न रत्ने देखील कोकणात समाविष्ट आहेत. अनेक जण विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असून त्यांना मेहनतीचे यश सुद्धा मिळत आहे. अभ्यास, खेळ ते अगदी सिनेजगतात देखील कोकणातील अनेक कलाकार कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले भेडशी गावातील सुप्रसिद्ध नाट्य कलाकार युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांचा अभिनय असलेला पंचक हा सिनेमा चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये बाबा टोपले यांनी डॉक्टरची भूमिका साकारली आहेत त्यांच्या या भूमिकेबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे बांधकाम क्षेत्रामध्ये आपले कौशल्य आजमावत असताना आपल्या अंगी असलेल्या छंद कलागुणांना वाव देत ते अनेक मराठी चित्रपट, मलिका मध्ये आपला अभिनय सादर करत असतात त्यांनी झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले यामध्ये केलेली डॉक्टरची भूमिका खूप गाजली होती त्यामुळे त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये अनेक संधी प्राप्त होत आहेत. या चित्रपटांमध्ये बाबा टोपले यांच्यामुळे भेडशी गावातील स्थानिक कलाकारांना अभिनय करण्याची संधी मिळाली आहे या चित्रपटातील काही भागाचे चित्रीकरण सावंतवाडी तालुक्यात झाले असुन हा चित्रपट डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 5 =