You are currently viewing मी निष्ठावंत राहिलो असताना देखील मला शिंदे गटात घेतलं नाही अशा बातम्या विव्हर्स वाढविण्यासाठी चालवल्या जातात!

मी निष्ठावंत राहिलो असताना देखील मला शिंदे गटात घेतलं नाही अशा बातम्या विव्हर्स वाढविण्यासाठी चालवल्या जातात!

*मी निष्ठावंत राहिलो असताना देखील मला शिंदे गटात घेतलं नाही अशा बातम्या विव्हर्स वाढविण्यासाठी चालवल्या जातात!*

*आ. वैभव नाईक यांनी पत्रकारांना काढला चिमटा*

*ओरोस पत्रकार भवन येथे पत्रकार दिन कार्यक्रमास आ.वैभव नाईक यांची उपस्थिती*

पत्रकारांनी वस्तुस्थिती दर्शक बातम्या छापल्या पाहिजेत. आपण दिलेल्या बातम्यांचा समाजामध्ये काय परिणाम होतो याचा पण विचार करावा. आपल्या बातमीला जास्तीत जास्त विव्हर्स यावेत यासाठी अनेक जण बातमीचे अनोखे हेडिंग देतात. यावेळी आपलंच उदाहरण देताना आ. वैभव नाईक म्हणाले, मी शिवसेनेशी आणि उद्धवजी ठाकरेंसोबत निष्ठावंत राहिलो असताना देखील मला शिंदे गटात घेतलं नाही अशा बातम्या दिल्या जातात. असा चिमटा आ.वैभव नाईक यांनी पत्रकारांना काढला. ते म्हणाले अशा हेडिंग मुळे बातमीचे केवळ विव्हर्स वाढतात मात्र विश्वासहार्यता टिकविणे तितकेच महत्वाचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही प्रगल्भ पत्रकारिता आहे. जिल्ह्यात अनेक चांगले पत्रकार आहेत. ज्या पत्रकरांना पुरस्कार प्राप्त झालेत त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

ओरोस पत्रकार भवन येथे दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच पत्रकार दिन व पुरस्कार वितरण समारंभ आज संपन्न झाला.या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवत बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले. तसेच पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार माधव कदम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, दै. पुढारी आवृत्ती प्रमुख गणेश जेठे, दै. लोकमत आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, रमेश जोगळे, देवयानी ओरोसकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =