You are currently viewing तोंडवळी येथील ठाकरे गटाचे गणेश तोंडवळकर व अनेक कार्यकर्ते भाजपात

तोंडवळी येथील ठाकरे गटाचे गणेश तोंडवळकर व अनेक कार्यकर्ते भाजपात

तोंडवळी येथील ठाकरे गटाचे गणेश तोंडवळकर व अनेक कार्यकर्ते भाजपात

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मालवण

तोंडवळी येथील ठाकरे गटाचे कार्यकर्ते गणेश तोंडवळकर यांच्यासह अनेक सहकारी कार्यकर्ते यांनी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

मालवण येथील निलेश राणे यांच्या नीलरत्न निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. गावात अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश करत असल्याचे गणेश तोंडवळकर यांनी सांगितले. यात तोंडवळी फाटा ते वाघेश्र्वर मंदिर रस्ता पूर्ण करणे, सुरूचे बन येथील मार्ग सुस्थितीत करणे. किनारपट्टीवर बंधारा उभारणे, या प्रमुख मागण्या निलेश राणे यांच्याकडे करण्यात आल्या. सकारात्मक प्रतिसाद दर्शवत विकासकामांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली असल्याची माहिती तोंडवळकर यांनी दिली.

प्रवेशकर्ते कार्यकर्ते यांच्यात गणेश तोंडवळकर यांच्यासह स्वप्नील पेडणेकर, ओंकार पाटील, प्रसाद आंबेरकर, दिपेश हडकर, वृषाल पाटील, कल्पेश नाईक, मनोज नाईक, विशाल झाड, आनंद झाड, बंड्या खोत, सतीश पेडणेकर, यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, राहुल गोलतकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =