You are currently viewing शिवसेनेकडून कोविड लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात ये-जा’साठी रिक्षेची मोफत सुविधा

शिवसेनेकडून कोविड लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात ये-जा’साठी रिक्षेची मोफत सुविधा

शहर शिवसेनेच्यावतीने १७ प्रभागांमध्ये नागरिकांसाठी ही सुविधा होणार उपलब्ध!

शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांची माहिती…!

कणकवली

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झालेला असताना प्रशासनावर आलेला ताण कमी होण्यासाठी व नागरिकांना सुलभरित्या कोविडचे लसीकरण करून घेता यावे यासाठी कणकवली शहर शिवसेनेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा मंत्र शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. हाच मंत्र कणकवली शहर शिवसेनेने कोविडच्या कठीण काळात अंमलात आणण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सोमवारी कणकवली शहर शिवसेनेची येथील विजय भवनमध्ये बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कणकवली शहरातील १७ ही प्रभागातील कोविड लसीकरणासाठी शासन नियमानुसार पात्र असलेल्या शहरवासीयांना व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी रिक्षेची मोफत सुविधा शहर शिवसेनेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
येत्या दोन दिवसात कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर कोविडची लस येण्याची शक्यता आहे. लस आल्यानंतर सलग पाच दिवस कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने १७ प्रभागांमध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रभागनिहाय प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यावर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या शहरातील लाभार्थ्यांना त्यांच्या घरापासून लसीकरण सेंटरपर्यंत रिक्षेची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्या नागरिकाला पुन्हा घरापर्यंत रिक्षेद्वारे सोडण्याची व्यवस्था ही शिवसेनेकडून होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर व शहरप्रमुख शेखर राणे यांनी दिली. कणकवली शहरातील जनतेने या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाईक व कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने केले आहे. या बैठकीला नगरसेवक कन्हैया पारकर, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, शिवसेना शहरप्रमुख शेखर राणे, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, विलास कोरगावकर, गौरव हर्णे, योगेश मुंज, युवासेना शहर प्रमुख तेजस राणे, आदित्य सापळे, सुनील पारकर, बाबू जाधव, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, प्रसाद अंधारी, सोमा गायकवाड, वैभव मालडकर, महेश राणे आदी शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eight =