You are currently viewing महामार्गावरून बसस्थानकात जाणाऱ्या एस.टी.ची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी

महामार्गावरून बसस्थानकात जाणाऱ्या एस.टी.ची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी

महामार्गावरून बसस्थानकात जाणाऱ्या एस.टी.ची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी

कणकवली

महामार्गावरून बसस्थानकात जाणाऱ्या एस.टी.ची दुचाकीस्वाराला धडक बसली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. शैक्षणिक सहलीसाठी आष्टी वरून ही बस कणकवलीत आली होती. दरम्‍यान असे अपघात टाळण्यासाठी सर्व्हीस रस्त्यावर बसस्थानक परिसरात गतीरोधक उभारण्याची मागणी होत आहे.
अपघातानंतर आगार प्रमुख संदीप पाटील हे काही वेळाने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सर्विस रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. कणकवली बस स्थानक समोरील उड्डाणपुल पिलरच्या मधून एस.टी. बस ये जा करतात. अचानक महामार्गावरून येणारी बस दुचाकीस्वारांना दिसत नाही. तर बस चालकांनाही सेवा रस्त्याच्या मध्यभागी येईपर्यंत येणारी वाहने दिसत नाहीत. त्‍यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताची शक्‍यता निर्माण होते. असे अपघात टाळण्यासाठी बसेस बाहेर पडण्याच्या मार्गावर गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा