You are currently viewing ” मला लाभलेला मौल्यवान मित्र-खडा “दिलीप शिरपूरकर “

” मला लाभलेला मौल्यवान मित्र-खडा “दिलीप शिरपूरकर “

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी अरुणवी देशपांडे लिखित लेखमाला-मागे वळून पाहतांना*

*” मला लाभलेला मौल्यवान मित्र-खडा “दिलीप शिरपूरकर “*
—————————————-
मित्र हो नमस्कार-
आपण स्वतःबद्दल सांगतांना अनेकदा उल्लेख करीत असतो
काही “लकी गोष्टींचा, लकी प्रसंगांचा, आणि लकी -व्यक्तींचा”. या तीनही गोष्टी आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट्स असतात.

वरील तिन्ही गोष्टी माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट्स ठरल्या आहेत त्या एकाच व्यक्तीमुळे, हा मित्र ,त्याची मैत्री
म्हणजे माझ्यासाठी मोस्ट लकी टर्निंग पॉईंट आहे.

चाळीस वर्षांपासून मला लाभलेला मौल्यवान ,मौलिक असा
मित्र-खडा” (Preceious jems)
ज्याचे नाव आहे दिलीप शिरपूरकर.

1983-84 ही ती वर्ष होती, संत जनाबाईच्या गंगाखेड या गावी हैद्राबाद बँकेत ,औरंगाबादहून माझी बदली झाली.
या ब्रँचमधील शिरपूरकर यांची एक सहकारी व मित्र अशी पहिली ओळख झाली.

अधिक परिचय झाल्यावर कळत गेले की , साहित्य, वाचन, पुस्तके, लायब्ररी “हा आमच्या मैत्रीला घट्ट बांधून ठेवणारा मोठा भावनिक धागा आहे.

एप्रिल -मे १९८३ या दोन महिन्यातील सलग चार गुरुवार शिरपूरकर मला प्रा.मधुकर देशपांडे सर,यांच्या भेटीसाठी घेऊन गेले. सरांची भेट होण्याचा योग आलाच नाही.

हे प्रा.देशपांडेसर पुणेकर -लेखक, संत जनाबाई महाविद्यालयात मराठी अध्यापन करीत. त्यांच्या सहवासात आपल्यातील साहित्यिक घडवू या “,या उद्देशाने दिलीप शिरपूरकर झपाटून गेले .

जिद्दी स्वभावाच्या शिरपूरकरची पाठपुरावा करण्यातली चिकाटी पाहून मी मनोमन त्यांना मानले .
त्यांनी म्हणावे, मी निघावे “असे सुरू झाले .
आणि एका गुरुवारी शिरपूरकर यांच्या प्रयत्नांचे सार्थक झाले .
आम्हाला एक नव्हे तर दोन साहित्य मार्गदर्शक गुरू लाभले “प्रा.दीनानाथ फुलवाडकर आणि प्रा.मधुकर देशपांडे सर”

१९८३ ते,८५ – सलग तीन वर्षे “शिरपूरकर यांच्या नेतृत्वात मी, अनिल रामदासी, शरद कुलकर्णी मांगलेकर,आणि बाबा कोटम्बे ,ई , आमच्या “कथा नादमंडळमुळे लेखक तयार झाले.

दिलीप शिरपूरकर यांनी जर त्यावेळी चिकाटी सोडली असती तर, आमच्यापैकी कुणीही कधी साहित्यिक वगैरे झालाच नसता.पण असे झाले नाही.
आता चाळीस वर्षे झालीत, आम्ही अजून लेखन सक्रिय आहोत. याचे शंभर टक्के श्रेय दिलीप शिरपूरकर यांनाच दिले जाईल.

१९८८ मध्ये परभणीला श्रीराम नगर बँक कॉलनीत माझ्या घराचे बांधकाम सुरू झाले.हौसिंग लोनची पहिली
इन्स्टॉलमेंट येण्याअगोदर बेसमेंट लेव्हल काम करतांना आरंभीच “पैश्यांची अडचण “, अशा क्रिटिकल वेळी परभणी रेल्वेस्टेशन प्लॅट फॉर्मवर बोलत असतांना,
दिलीप शिरपूरकर यांनी माझ्या खिशात 5000/- रु .चा मेल ट्रान्सफर ऑर्डरचा लिफाफा टाकला.
आज काय पण कधीच या मदतीचे मोल करूच शकणार नाही.
पुढे एकदा भेटीत शिरपूरकर म्हणाले , आर डी अकाउंटवर
डिमांड लोन घेऊन मी तुम्हाला ते पैसे पाठवले.

शिरपूरकर हा मित्र माझ्यासाठी असा मौल्यवान ठरलेला
आहे. माझ्यासाठी ऋणाईत “झालेल्या या मित्र-ऋणाची परतफेड होऊच शकत नाही.

गेल्या काही वर्षात कवी-दिलीप शिरपूरकर यांची साहित्यक्षेत्रातील वाटचाल मोठ्या जोमाने चालू आहे.
दिलीपराव , तुमचा कविता संग्रह येऊ द्या आता,
अशी विनंती या निमिताने करतो.

श्री.दिलीप शिरपूरकर, सौ.शिरपूरकरवहिनी ,उभयता
आजी आजोबांच्या रोलमध्ये मजेत आहेत.
मित्र हो-
दोन ओळी या खास मित्रासाठी-
दिसे हा रुक्ष-कठोर फणसापरी ।
परी असे अंतरी रसाळ ऊसापरी ।।
——————————- – — – –
ले-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा