You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेचा नुतन इमारत स्थलांतर सोहळा माजी खास निलेश राणे यांच्या हस्ते

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेचा नुतन इमारत स्थलांतर सोहळा माजी खास निलेश राणे यांच्या हस्ते

सिंधुनगरी (प्रतिनिधी) :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. शाखा मसुरे ही शाखा मसुरे – मर्डे येथील शिवाजी परब यांच्या इमारतीमध्ये स्थलांतरित होत असून या शाखेचा स्थलांतर सोहळा बुधवार, दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता माजी खासदार निलेशजी राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तसेच जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर, जिलहा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, संदीप परब,मेघनाद धुरी, उद्योजक श्रीकृष्ण परब, मसुरे ग्रामपंचायत सरपंच संदीप हडकर, देऊळवाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मसुरेचे अध्यक्ष विश्वास साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

या स्थलांतर सोहळ्यास आपण सर्वजण उपस्थित राहून बँकेवरील आपले प्रेम वृद्धिंगत करावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 18 =