You are currently viewing स्मृति भाग १५
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्मृति भाग १५

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग १५*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण पराशर स्मृतिमधील एका वेगळ्या म्हणण्यापेक्षा आगळ्यावेगळ्या श्लोकाचा विचार करणार आहोत . तो श्लोक लक्ष वेधून घेतो .

*औरसः क्षेत्रजश्चैव दत्तः कृत्रिमकः सुतः ।*
*दद्यान्माता पिता वापि स पुत्रो दत्तको भवेत्॥*
मुले चार प्रकारची असतात . १) औरस , २)क्षेत्रज , ३)दत्तक , ४) कृत्रिम . आई अथवा वडिल ज्यास कुणाला देतात तो मुलगा दत्तक असतो .
ज्यांना मुलं होत नाही , त्यांना काय वेदना असतात ? कशा वेदना असतात ? मुलगा होण्यासाठी दम्पती काय काय प्रयत्न करतात ? किती डॉक्टर्सचे दवाखाने झिजवतात ? कल्पना न केलेलीच बरी ! किती पैसा उधळला जातो , केवळ बाळ होण्यासाठी . शेवटी मुलगी झाली तरी चालेल पण मी आई झाली पाहिजे , ही इच्छा असते पत्नीची ! आणि पूर्ण करण्याचा आटापिटा करतो पति आणि सर्व नातेवाईक ! कसं जीवन असतं ना ! ज्यांना होतात ते म्हणतात एकच पुरे , मुलगी असली तरी चालेल ? आणि कायदा होतो संसदेत ” एक या दो बस ! ” पाळतात सगळे संविधान मानणारे ! पण कायदा झाल्यापासून ज्यांनी कायदा ही मानला नाही आणि राष्ट्रध्वज वा वन्देमातरम् ही मानत नाहीत त्यांनी कायदा व संविधान झुगारलेच आणि दोनपेक्षा जास्त मुलांचे धनी झालेत ! ” मी धनी झालेत ” हा शब्दप्रयोग वापरला , कारण मुले ही संपत्ती असते आणि ती खरी असते हे या जगात बरेचवेळा सिध्द झाले आहे !👍 आणि फक्त हिंदू समाजावर हे सांपत्तिक नियंत्रण आले !!!! ते ही कसे ? आयकर भरणारांनी एकदोनच मुलं जन्माला घालायची व रेशनच्या दुकानात रांगा लावणारांनी खो—खो ,कबड्डी वा क्रिकेटची टीमच उभी करायची !! आणि असरकारी ( अ—सरकारी!)सरकारचं व त्यांच्या यंत्रणेचं तसेच न्यायालयांचं जाणून बुजून दुर्लक्ष !
” पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ” , ही म्हण सगळे जाणतातच ! पण ” तीन्ही लोकी ” ( स्वर्ग — पृथ्वी आणि नरक म्हणजे पशुवत जीवन ! हे तीन्ही लोक . ) शब्दांचा हिंदूंनाच विसर पडला आणि आज भारतीय संस्कृतीवर हल्ले चढवणारे भारतीय पाहिले की लाज वाटते ! असो .
श्री मनुमहाराजांनी ( ब्राह्मणांनी म्हणजे सकारात्मक विचारवंतांनी सांभाळलेला क्षत्रिय वर्ण गुणकर्मयुक्त एकमेवाद्वितीय राजा ) बारा प्रकारचे पुत्र सांगितले आहेत . *१)औरस , २)क्षेत्रज , ३)दत्तक , ४) कृत्रिम , ५)गूढोत्पन्न , ६)अपविद्ध , ७)कानीन , ८)सहोढ , ९)क्रीत , १०)पौनर्भव , ११)स्वयंदत्त आणि १२)शौद्ध* . कुणीही पुत्राशिवाय रहाणार नाही याची केवढी काळजी श्रीमनु महाराजांना ! आम्ही घेवू त्यांची काळजी येवढी ! अरे ! हो , व्याख्या राहिल्याच की सांगायच्या !! सांगतो !🙏सांगतो .
१)औरस—विवाहित सवर्णा स्त्रीपासून झालेली संतती .
२)क्षेत्रज—मृत वा नपुंसक वा व्यसनी माणसाच्या पत्नीस दीराकडून झालेली संतती .
३)दत्तक—दुसर्‍याचा दत्तकविधानाने घेतलेला पुत्र .
४)कृत्रिम—एखाद्या सद्गुणी मुलास दत्तक विधानाशिवाय आपला पुत्र म्हणून नियुक्त करणे .
५)गूढोत्पन्न—कुणापासून झाला हे निश्चित नसेल तर तो !
६)अपविद्ध—आईवडिलांनी त्यागलेला व दुसर्‍याने सांभाळलेला तो .
७)कानीन—विवाहिता कन्येस कुमारिका अवस्थेतच गुप्त रितीने उत्पन्न पुत्र तो तिच्या पतीचा कानीन .
८)सहोढ—गर्भार कन्येचा ज्या पुरुषाशी विवाह झाला तो गर्भजात पुत्र त्या माणसाचा सहोढ .
९)क्रीत—आईवडिलांना मूल्य देवून विकत घेतलेला मुलगा.
१०)पौनर्भव—पतिद्वारा त्यागल्यानंतर अथवा विधवा वा वा स्वेच्छाचारिणी झाल्यावर दुसर्‍या माणसाकडून झालेला पहिल्यासाठी पौनर्भव.
११)स्वयंदत्त—मातृपितृविहीन अथवा मातपित्याने त्यागल्यावर त्या मुलाने ज्या दाम्पत्यास ” मी तुमचा मुलगाच आहे !” असे सांगितले , तो त्यांचेसाठी स्वयंदत्त. आणि
१२)शौद्ध—विवाहिता शूद्रा व ब्राह्मण संयोगाने झालेला मुलगा , त्यास ” पार्शव वा शौद्र ” ही म्हटले जाते !
आणि सर्व संततीत *औरस* पुत्र श्रेष्ठ , हे ही सांगून ठेवलंय . याचा अर्थ औरस पुत्रच हवा , पण यदा कदाचित परिस्थिती विचित्र उद्भवली तर काय ? म्हणून इतर प्रकार ही सांगून ठेवलेत ! चला , आज फार झाले . पण स्मृतिकारांनी कुणीही अपत्याशिवाय राहू नाही म्हणून किती प्रकारची संतती असते वा असू शकते हे सांगितले लोककल्याणासाठी ! यातील बहुतेक प्रकार आपल्याला जगाच्या इतिहासात पहायला मिळतातच ! इतःपर आज जे सामाजिक आणि संवैधानिक न्यायाने असेल ते ग्राह्य धरावे . आता थांबतो .
विनंती इतकीच , पराशर स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =