You are currently viewing राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर

*राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर*

वैभववाडी

२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३ चा निकाल जाहीर झाला आहे.
यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय गटात कु.गौरवी खोत, महाविद्यालय गटात डॉ. प्रमोद घाटगे तर खुल्या गटात श्री.नागेश कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ४२ स्पर्धकांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला होता.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक, ग्राहक पंचायतचे संस्थापक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करणारी शासनमान्य व समाजमान्य असलेल्या
ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने दि.२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३ आयोजित केली होती. ग्राहक राजाची होणारी अडवणूक, फसवणूक थांबावी आणि तो जागृत होऊन शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने संस्थेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त
तीन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे.
पहिला गट- कनिष्ठ महाविद्यालय गटात प्रथम -कु.गौरवी गणपत खोत (नेमळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे), द्वितीय- कु.भक्ती संदेश मांजरेकर (कनिष्ठ महाविद्यालय कासार्डे), तृतीय- कु.आकांक्षा धोंडू माश्ये (श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय पडेल)
दुसरा गट- महाविद्यालय गटात प्रथम- डॉ.प्रमोद रामचंद्र घाटगे (श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी), व्दितीय- कोमल शिवराम पाताडे (बी.फार्मसी कॉलेज सांगुळवाडी), तृतीय- कु.प्राजक्ता जगन्नाथ पाटील (आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी)
तिसरा गट- प्रथम- श्री. नागेश रघुनाथ कदम (सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवण), द्वितीय- श्री. संजीव आत्माराम राऊत (जामसंडे-देवगड), तृतीय- श्री.संतोष ज्ञानेश्वर गवस (मळगाव-सावंतवाडी)
या तीन गटातील प्रथम तीन विजयी स्पर्धकांना गुरुवार दिनांक २८ डिसेंबर रोजी वैभववाडी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्व विजयी स्पर्धकानी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले बक्षीस स्वीकारावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा