You are currently viewing प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच विद्यार्थिनींची निवड

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच विद्यार्थिनींची निवड

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच विद्यार्थिनींची निवड

26 जानेवारी रोजी दिल्ली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेला प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच विद्यार्थिनींची निवड झाली आहे .कु. करीना खराडे (मालवण),कु. ऋतुजा राणे (मालवण ),कु.समिता कुबल (मालवण),कु. ममता गावडे (वेंगुर्ला ),कु.सानिका केरकर (कुडाळ) यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी *वंदे भारतम्* या कार्यक्रमात या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
26 जानेवारी रोजी कर्तव्य पथ दिल्ली येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला
माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुरमु व
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे जाण्यासाठी *मा.निलेशजी राणे*, मालवण कुडाळ विधानसभा संयोजक यांनी आर्थिक मदत करून सहकार्य केले आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विजय केनवडेकर जिल्हाउपाध्यक्ष ,धोंडी चिंदरकर तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते मदत देण्यात आली, यावेळी सुदेश आचरेकर, ललित चव्हाण भाजयुमो अध्यक्ष, संतोष गावकर ,रवि घागरे ,पंकज गावडे, संकेत कुलकर्णी, संकेत हसोळकर, उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =