You are currently viewing सावंतवाडीत २७ ते ३१ या कालावधीत “सुंदरवाडी मिनी महोत्सव”

सावंतवाडीत २७ ते ३१ या कालावधीत “सुंदरवाडी मिनी महोत्सव”

सावंतवाडीत २७ ते ३१ या कालावधीत “सुंदरवाडी मिनी महोत्सव”…

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी, दिपक केसरकर मित्रमंडळ, रोटरी आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी उद्यानाच्यासमोर २७ ते ३१ या काळात “सुंदरवाडी मिनी महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर विविध फुड स्टॉलचा आनंद खवय्यांना घेता येणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला सर्वांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सर्व संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी केले.
श्री. केसरकर यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिंदे गटाचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर, रवी जाधव, संजय पेडणेकर, सुहास सातोसकर, राजू पनवेलकर, दर्शना रासम, डॉ. मिना जोशी, रिया रेडीज आदी पदाधिकारी उपस्थित होते.
२७ तारखेला हा महोत्सव सुरू होणार आहे. यात पहिल्या दिवशी रेकॉर्ड डान्स स्पर्धा, २८ तारखेला सावंतवाडी ओंकार कलामंच आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, २९ तारखेला प्रणाली कासले निर्मित लावण्यखणी हा लावणीचा कार्यक्रम, ३० तारखेला इनरव्हील क्लब च्या माध्यमातून इनरव्हिल क्वीन हा कार्यक्रम होणार आहे. तर शेवटच्या दिवशी हेमांगी सावंत यांचा ऑक्रेस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन व समारोपाला मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी रवी जाधव म्हणाले, या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून मिळणार्‍या निधीतून सावंतवाडीत शववाहिनी आणि वैकुुंठ रथ आणण्याचा मानस आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा