You are currently viewing निर्यातक्षम आंबा बागांची हॉर्टीनेटव्‍दारे मॅगोनेट प्रणालीवर नोंदणी करा

निर्यातक्षम आंबा बागांची हॉर्टीनेटव्‍दारे मॅगोनेट प्रणालीवर नोंदणी करा

– विभागीय कृषी सह संचालक

सिंधुदुर्गनगरी 

निर्यातक्षम आंबा बागांची हॉटीनेटव्दारे मॅगोनेट प्रणालीवर नोंदणी करण्याची शेवटची मुदत ही दिनांक 31 मार्च 2021  पर्यंत असून संबंधित आंबाबागायत दारांनी सन 2020-21 साठी नोंदणी करावी असे आवाहन विभागीय कृषी सह संचालक कोकण विभाग यांनी केले आहे.

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीकरिता “कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA)” च्‍या मॅगोनेट प्रणालीव्‍दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. कोंकण विभागात सन 2019-20 मध्‍ये 7944 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. अपेडा द्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करीता मॅगोनेट ही ऑनलाईन प्रणाली दिनांक 1 डिसेंबर,2020 पासून कार्यान्वित करण्‍यात आली असून फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप उपलब्‍ध केलेले आहे. सदर अॅप डाऊनलोड करुन नोंदणी सुविधा करण्‍यात  आलेली आहे.

निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी 5 वर्षासाठी वैध असेल. त्‍यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्‍या आंबा बागांची  नव्‍याने नोंदणी/नुतनीकरण करण्‍याची आवश्‍यकता नाही. नव्‍याने नोंदणी करणेसाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज, 7/12, 8अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्‍यक आहेत. मॅगोनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे.

कोंकण विभागातील सर्व आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करणे करीता आपले कार्यक्षेत्रातील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करण्‍याचे आवाहन विभागीय कृषी सह संचालक, कोंकण विभाग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − three =