You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पडेल खालचावाडीत ट्रान्सफॉर्मर लोकार्पण
Oplus_16908288

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पडेल खालचावाडीत ट्रान्सफॉर्मर लोकार्पण

सरपंच भूपण पोकळे व ग्रामपंचायत पडेल यांच्या प्रयत्नांना यश; अनेक वर्षांची वीज समस्या मार्गी

देवगड / प्रतिनिधी :

पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हावार्षिक योजनेतून खूप वर्षे प्रलंबित असलेल्या पडेल खालचावाडी येथील नवीन ट्रान्सफॉर्मरला मंजुरी देण्यात आली होती. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर या नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.

पडेल खालचावाडी येथील रहिवासी ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून अनियमित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या समस्येबाबत सरपंच भूपण पोकळे व ग्रामपंचायत पडेल यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करून समस्या मांडली होती.

या मागणीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. निधी उपलब्ध झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्णत्वास गेले असून त्यामुळे खालचावाडी परिसरातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. काम पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत गावाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

यावेळी सरपंच भूपण पोकळे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, श्रीपाद मराठे, मधुसूदन काळे, नारायण बाणे, जयेश तानवडे, विद्याधर देवधर, सुरेश मराठे, सचिन देवधर, प्रसन्ना देवधर, संतोष गोठणकर, सुधाकर बाणे, तुकाराम गोठणकर, संकेत बाणे, विनायक देवधर, अक्षय बाणे, राजेंद्र तानवडे, रमेश बाणे, बाळा अनभवणे, काँट्रॅक्टर भोकटे तसेच महावितरणचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा