You are currently viewing “अस्वस्थ, सामाजिक मन”

“अस्वस्थ, सामाजिक मन”

“अस्वस्थ, सामाजिक मन”

आनंदवन, भारतवर्षातील रंजल्या-गांजलेल्यांचे हक्काचे घर.जगाने झिडकारलेल्या हजारो अगतिकांचा आसरा, स्नेहमय सावली देणारा निवारा. आमटे कुटूंबिय म्हणजे या देशाची एक वैभवशाली असेट. ज्या बाबा आमटे या एका नावांची जादू अवघ्या विश्वावर आहे. जगातील प्रत्येक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता हे या नावांचे सदैव स्मरण करतो. भक्ती करतो आणि मी भारतीय असल्याचा गर्वही करतो. सामाजिक कार्यकर्त्यांना सतत उर्जा देणारी अनेक नावं आहेत. स्व.भारतरत्न बाबा आमटे, डाँ बंग दांपत्य, सुधा मूर्ती, स्व.श्रध्देय दंतोपंत ठेंगडीजी हे सगळे दिपस्तंभ आहेत.
स्व.बाबा आमटे यांचा सहवास आणि संस्कार घेऊन मा.प्रकाश आमटे आणि कुटुंबियांनी सगळ्या भौतिक सुखावर लाथ मारुन आदरणीय बाबांचाच मार्ग स्विकारला. दुर्गम भागात अगदी प्रतिकुल परिस्थिती सरकार नावाच्या कायद्याच्या चौकटीत आनंदवन फुलवणे म्हणजे प्रत्येक दिवशी नवी आव्हाने, नवा संघर्ष,तरीही सर्वच कुटुंबियांना हा मार्ग स्वच्छेने स्विकारला असल्याने थोरामोठ्यांच्या सातत्यपूर्ण कष्टाने हे आनंदवन दिवसागणिक बहरत राहिलं.या कार्याची दखल राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.. अनेक मानाचे पुरस्कार मिळाले.विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जसे लाखो भाविक पंढरपूरची वारी भक्तीभावाने करतात तसेच देश परदेशातील अनेक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते हे या नंदनवनाला भेट देतात.. आणि या देशातील सामाजिक कार्याला आणि आमटे कुटुंबियांसमोर नतमस्तक होतात.
सर्व काही सुरळीत असतानाचा गेल्या चार महिन्यापासून आनंदवन बाबत काही नकारात्मक बातम्या विविध प्रिंट मिडिया आणि समाजमाध्यमातून प्रसारित होवू लागल्या. या बातम्या वाचून, ऐकून माझ्यासारखा सामान्य सामाजिक कार्यकर्ता बेचैन होता.. कधी कधी बहरलेल्या झांडावर कुणाची तरी नजर पडते आणि मग दगड मारले जातात… पण जेव्हा ते दगड स्वकिंयाकडूनच मारले जातात तेव्हा होणारं दुःख आणि वेदना फार भयंकर असतात.
सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या तीन गोष्टी अशा आहेत की या वर्तुळात माणूस गुरफटला की तो दिशाहीन होतो. आजच्या मन विषण्ण करणाऱ्या बातमीने फारच अस्वस्थ झालो.
भारतरत्न स्व.बाबा आमटे यांची नात आणि नंदनवनच्या सि.ई.ओ.डॉ. शितल आमटे यांनी आत्महत्या केली..कारण कोणतंही असो पण जगाने सेवाभावी आणि समर्पित सामाजिक कामासाठी ज्या नंदनवनला अधोरेखित केलेलं आहे ज्या आमटे परिवाराने आपलं सर्वस्व देशसेवेसाठी दिलं त्या नंदनवनात घडलेल्या या घटनेमुळे सामाजिक मन अस्वस्थ झालयं हे निश्चित.
… डॉ. सौ.शितल आमटे यांनी असं पाऊल उचलता कामा नये होत…महाराष्ट्राचीच नव्हे तर जगाची फार मोठी सामाजिक हानी झालेली आहे….
…डॉ. शितल आमटे यांना भावपूर्ण आदरांजली….
.. अँड.नकुल पार्सेकर..
सामाजिक कार्यकर्ता,सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + six =