You are currently viewing अमरावतीमध्ये होणार ३ रे अ. भा. शिव मराठी साहित्य संमेलन

अमरावतीमध्ये होणार ३ रे अ. भा. शिव मराठी साहित्य संमेलन

*अमरावतीमध्ये होणार ३ रे अ. भा. शिव मराठी साहित्य संमेलन*

*छत्रपती संभाजीनगरचे कवी ॲड.सर्जेराव साळवे प्रमुख अतिथी*

डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आणि मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २४ डिसेंबर २०२३ रोजी रविवारला हे संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
या संमेलनाचे उद्घाटक श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धन देशमुख, संम्मेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत अमरावती येथील डॉ. सतिश तराळ, स्वागताध्यक्ष मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता देशमुख, कार्याध्यक्ष युवा संसद संस्था अमरावतीचे अध्यक्ष श्री नितीन पवित्रकार, संयोजक प्रा. डॉ.मंदा नांदुरकर, संमेलनाचे निमंत्रक डॉ. मंगेश निर्मळ अमरावती, सहसंयोजक प्रा. डॉ. गजानन घोंगटे, वाशिम सहकार्याध्यक्ष प्रा.आनंद महाजन, अमरावती सह निमंत्रक श्री गजानन ईटनारे , अमरावती यांच्यासह फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा सहभाग असून सकाळी ८ ते ९ या वेळात ग्रंथ दिंडीचे आयोजन केलेले आहे. स. ९ ते ११.३० उद्घाटन सोहळा संपन्न होणार तर ११.३० ते १ या वेळात कथाकथनाचे आयोजन केलेले आहे. कथाकथनाचे अध्यक्ष जेष्ठ कथाकार, अभिनेत्री मेघना साने, मुंबई सूत्रसंचालन फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पूजाताई खेते कथाकथनाचे सहभागी नागपूर येथील मा. विजया मारोतकर , मुक्ताईनगर येथील श्री प्रमोद पिवटे, अमरावती येथील श्री विनोद तिरमारे ठाणे येथील श्री योगेश जोशी जळगाव येथील श्री मधुकर पोतदार कोल्हापूर येथील सौ. पुष्पावती दरेकर यांचा सहभाग आहे. दुपारी २ ते ४ सत्रात परिसंवादाचे आयोजन केलेले आहे. परिसंवादाचा विषय राष्ट्ररत्न लोकमहर्षी बॅरिस्टर डॉ.पंजाबराव देशमुख यांचे क्रांतिकार्य, परिसंवादाचे अध्यक्ष अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष सावरकर हे असून सूत्रसंचालन संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख वकील कवी सर्जेराव साळवे हे करणार आहेत. या परीसंवादामध्ये प्रमुख सहभाग म्हणून नागपूर येथील मा. डॉ. गणेश चव्हाण संभाजीनगर येथील डॉ. सुभाष बागल अमरावती येथील प्राचार्य अनिल प्रांजळे अमरावती येथील डॉ. मंदा नांदुरकर अकोला येथील डॉ. अशोक शिरसाट यांचा सहभाग आहे.
तर संध्याकाळी ४ ते ७ या वेळामध्ये साहित्यिक तथा प्रकाशाक कै.डॉ. गिरीश खारकर, काव्य व्यासपीठावर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सत्राचे अध्यक्ष अमरावती येथील प्राचार्य राज यावलीकर आहेत, तर सूत्रसंचालन फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमती ज्योतीताई राणे व सदस्य यशोदा पांढरे, जळगाव हे करणार आहेत. यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर येथील डॉ. शिवाजी शिंदे, संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध कवी अॅडवोकेट सर्जेराव साळवे, अमरावती येथील डॉ. श्यामसुंदर निकम व नीलिमाताई भोजने, चिखली येथील शाहीर मनोहर पवार, हिवरा आश्रम येथील डॉ. पंढरीनाथ शेळके, धाराशिव येथील डॉ.मधुकर हुजरे, ठाणे येथील श्री योगेश जोशी, पुणे येथील श्रीरामचंद्र गुरव, शेगाव येथील सौ. नंदिनी वैराळ व पूजाताई खेते ,शितल शेगोकार अकोला येथील डॉ. विनय तांदळे व सहभागी निमंत्रित कवी म्हणून फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी आहेत.
तसेच संध्याकाळी ७ ते ८ या वेळात समारोपीय प्रमुख अतिथी म्हणून अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री प्राचार्य डॉ. शोभाताई रोकडे हे समारोप करणार आहेत. तर रात्री ८.३० ते ९.३० या वेळात फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा सदस्य लोक कलाकार जादूगार डी. चंद्रकांत यांचा कटपुतली शो त्याचप्रमाणे शाहीर मनोहर पवार, अॅड सर्जेराव साळवे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अॅड. सर्जेराव साळवे यांनी या पुर्वी अनेक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले असुन ते उत्कृष्ठ निवेदक आहेत. गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी साहीत्य संम्मेलन, कवी संम्मेलन व चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविलेला असून सांस्कृतीक कार्यक्रम सादर केलेले आहेत. या संमेलनामध्ये राज्यातील २५ मान्यवरांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे तापी पूर्णा राज्यस्तरीय व इतर पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते मराठी स्वाक्षरी बॅनरवर मराठी स्वाक्षरी अभियान सुद्धा राबविण्यात येणार आहे. अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा