You are currently viewing मळेवाड-कोंडुरा गावाला स्वतंत्रपणे धान्य दुकान द्या – उपसरपंचाचे सावंतवाडी महसूलला निवेदन सादर

मळेवाड-कोंडुरा गावाला स्वतंत्रपणे धान्य दुकान द्या – उपसरपंचाचे सावंतवाडी महसूलला निवेदन सादर

मळेवाड-कोंडुरा गावाला स्वतंत्रपणे धान्य दुकान द्या – उपसरपंचाचे सावंतवाडी महसूलला निवेदन सादर

सावंतवाडी

ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्यावा, अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी महसूलला निवेदन देऊन केली आहे.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून दोन महसुली गाव या ग्रामपंचायतीला जोडलेले आहेत.यापैकी मळेवाड गावामध्ये रास्त धान्य दुकान असून कोंडुरे गावातील रास्त धान्य ग्राहकांना सुमारे साडेतीन ते चार किलोमीटरची पायपीट करून रास्त धान्य दुकानावर धान्य उचल करण्यासाठी यावे लागते. तरी कोंडुरे हे गाव महसुली वेगळे असल्याने या गावात स्वतंत्र रास्त धान्य दुकान परवाना द्यावा, अशी मागणी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांची भेट न झाल्याने त्यांच्यावतीने नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. हा परवाना मिळाल्यास रास्त धान्य ग्राहकांची मळेवाड येथे असलेलं रास्त धान्य दुकान दूर असल्याने होत असलेली गैरसोय दूर होणार आहे, असेही दिलेल्या निवेदनात मराठे यांनी नमूद केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा